सुवर्णपदकविजेत्‍या (डावीकडून) वृषाली भोये, कौसल्‍या पवार. esakal
नाशिक

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत खो-खोमध्ये महाराष्ट्रला दुहेरी सुवर्णपदक

अरुण मलानी

नाशिक : पंचकुला (हरियाना) येथे झालेल्‍या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजयश्री मिळविताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. मुलींच्‍या संघातून खेळताना नाशिकच्‍या कौसल्‍या पवारची अष्टपैलू कामगिरी आणि वृषाली भोयेचे धारदार आक्रमण मुलींच्‍या संघाच्‍या विजयासाठी महत्त्वाचे ठरले. मुलांच्‍या संघात नाशिकच्‍या चंदू चावरेचा सहभाग राहिला.

स्‍पर्धेतील मुलींच्‍या गटातून ओरिसा विरुद्धच्‍या अंतिम लढतीत पहिल्‍या डावातील दोन गुणांची आघाडी विजय मिळविण्यासाठी महत्त्वाची ठरली. पहिल्‍या डावात महाराष्ट्र संघाने बाद केलेल्‍या आठ गडींपैकी तब्‍बल पाच गडी हे वृषाली व कौसल्‍या यांनी बाद केले. वृषाली भोयेने ४ गुण, तसेच कौसल्‍या पवार हिने डावात प्रत्‍येकी एक मिनीट ४० सेकंदांचे संरक्षण केले. सोबत दोन गडी बाद करताना संघाच्‍या विजयात मोलाचे योगदान दिले.

सकाळच्या सत्रात मुलींची अंतिम लढत झाली. यात महाराष्ट्राने ओरिसावर २१-२० असा अतिशय अटीतटीच्या सामन्यात रोमहर्षक विजय मिळविला. नाणेफेक जिंकून ओरिसाने संरक्षण घेताना महाराष्ट्राला आव्हान दिले. मात्र पहिल्या डावात महाराष्ट्राने घेतलेली दोन गुणांची आघाडी विजयात महत्त्वाची ठरली. ही आघाडी मिळवून देण्यात नाशिकच्‍या कौसल्‍या व वृषाली यांनी मोलाचे योगदान दिले.

संरक्षण करताना पहिली तुकडी ३.५० मिनिटांत गारद झाल्‍यानंतर जान्हवी पेठे, प्रीती काळे यांनी ओरिसाच्या खेळाडूंशी करडी झुंज देताना योगदान दिले. या सामन्यात महाराष्ट्राची कर्णधार जान्हवी पेठे (१:३५, २:२० मिनीट संरक्षण), प्रीती काळे (१:४५, २:४० मिनीट संरक्षण व २ गुण), संपदा मोरे (१:३०, १:४० मिनीट संरक्षण व ६ गुण) यांनीही चांगली कामगिरी केली. ओरिसाच्या अर्चना (२:१५ १:४५ मिनिटे संरक्षण व २ गुण), स्मरणिका साहू ( १:३०, २:१० मिनिटे संरक्षण व ७ गुण) व अनन्या प्रधान (१:४५, १:३० मिनिटे संरक्षण व १ गुण) यांची कामगिरी संधाचा पराभव टाळू शकली नाही.

मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओरिसाचा १४-११ असा एक डाव तीन गुणांनी दणदणीत पराभव केला व सुवर्णपदकावर नाव कोरले. या सामन्यात महाराष्ट्राच्या शुभम थोरात (२ मिनिटे संरक्षण व २ गुण), नरेंद्र कातकडे (२ मिनिटे संरक्षण व २ गुण), ऋषिकेश शिंदे (२ मिनिटे संरक्षण), रामजी कश्यप (१:५० मिनिटे संरक्षण व ४ गुण) यांनी योगदान दिले. नाशिकच्‍या चंदू चावरेचाही संघात सहभाग होता. दरम्‍यान, ओरिसाकडून टी. जगन्नाथ दास (१:१० संरक्षण व ६ गुण) व संजीत यांचा एकतर्फी झुंज देण्याचा प्रयत्‍न अयशस्‍वी ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT