Aditya Thackeray- Dada Bhuse esakal
नाशिक

Maharashtra Politics | आदित्य ठाकरे मंत्री दादा भुसेंना भिडणार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेचे किल्ले मजबूत करण्यासाठी मैदानात उतरलेले युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) दुसऱ्या टप्प्यात राज्याचे बंदरे व गौण खनिज मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्याशी थेट भिडणार आहेत. २० ऑगस्टला भुसे यांच्या मालेगाव मतदार संघात नागरिकांशी जाहीर संवाद साधणार आहेत. (Latest Marathi News)

जून महिन्यात राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला. महाविकास आघाडीत प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ४० आमदारांनी वेगळी भूमिका घेत भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. शिवसेनेत उभी फूट पडल्याने खळबळ उडाली. बंडखोर आमदारांनी शिवसेना आमचीच असल्याचा दावा करताना चिन्हावर देखील हक्क सांगितल्याने ठाकरे परिवारातील युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्याचा निर्णय घेतला.

मागील महिन्यात नाशिक दौऱ्यावर आदित्य ठाकरे आले होते. आता नाशिक दौऱ्याचा दुसरा टप्पा असून या दौऱ्यात बंदरे व गौण खनिज मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात ते धडक देणार आहेत. २० ऑगस्टला खानदेशचा दौरा आटपून धुळेमार्गे सायंकाळी पाच वाजता मालेगावमध्ये आदित्य ठाकरे यांचे आगमन होईल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ते घेणार आहेत. संध्याकाळी साडेसहा वाजता कार्यकर्त्यांशी संवाद साधते. सायंकाळी साडेआठ वाजता ते मुंबईत रवाना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : अन्याय, भ्रष्टाचारावर शांत बसत असाल तर…, तुकाराम मुंढेंच्या पोस्टने लक्ष वेधलं

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Cabinet: दिलीप वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती

Maharashtra Monsoon: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यातील ८३ तालुक्यांत २० दिवसांहून अधिक पाऊस गायब; खरीप पिके करपण्याच्या मार्गावर

Amruta Fadnavis: गरबा सर्वसमावेशक उत्सव; मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध का? अमृता फडणवीस यांची भूमिका

SCROLL FOR NEXT