Supriya Tupe.jpg 
नाशिक

महाराष्ट्र कुस्ती चँपियनची दहावीच्या आखाड्यातही बाजी..!

वाल्मिक शिरसाट

नाशिक  : कुस्त्यांचा आखाड्यात आपल्या कुशलतेने व चपळाईने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवून तीनदा महाराष्ट्र चँपियन झालेली नाशिकची महिला कुस्तीपटू सुप्रिया तुपे हिने दहावीच्या बुधवारी जाहीर झालेल्या निकालात ८८ टक्के मिळवून दहावीच्या निकालाचा आखाडा गाजविला. 

अभ्यासाबरोबर कुस्त्यांची आवड जोपासत आहे

बेलू (ता. सिन्नर) गावातील सुप्रियाला लहानपणापासूनच कुस्त्यांची आवड असल्याने ती या खेळाकडे आकर्षित झाली. वडील बहिरू तुपे लष्करातील सेवा करत असल्याने तिचे वेगवेगळ्या शाळांमध्ये सुरवातीचे शिक्षण झाले. त्यांची सेवा पूर्ण झाल्यानंतर सुप्रियाने देवळाली कॅम्प येथील वासुदेव अथणी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ॲडमिशन घेतले. तेथील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तिने शालेय अभ्यासाबरोबर कुस्त्यांची आवड जोपासत आहे.

८८ टक्के गुण मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

शालेय स्तरावरील कुस्त्यांमध्ये तिने सहभाग नोंदवीत शाळेला कुस्तीमध्ये पदके मिळवून दिली. तीन वेळा महाराष्ट्र चँपियन ठरली. यात शाळेच्या मुख्याध्यापिका, क्रीडाशिक्षक व विषय शिक्षकांचे सहकार्य मिळाले. कुस्ती स्पर्धेत गाजविलेल्या कामगिरीमुळे सुप्रियाला पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तिने सराव केला. मात्र दहावीचे बोर्डाचे महत्त्वाचे वर्ष असल्याने तिने दुसऱ्या सत्रापासून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले. ८८ टक्के गुण मिळवून ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. या यशाचे श्रेय शाळेतील सर्व शिक्षक, आई-वडील व बहिणीचे असल्याचे सुप्रियानेसकाळ ला सांगितले. 

रिपोर्ट - वाल्मिक शिरसाट 

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 4th T20I : भरवशाच्या म्हशीला टोणगा! भारताच्या फलंदाजांनी माती खाल्ली, श्रेयस अय्यरच्या खेळीने लाज वाचवली

Ashadhi Wari : आनंदोत्साहात पालखी सोहळा पुण्यनगरीमध्ये

IND vs ENG 4th T20I : पुन्हा तेच... वैभव सूर्यवंशी IPL समजून खेळायला गेला अन् जोफ्रा आर्चरने पुन्हा कार्यक्रम केला... Video

Sakal Impact : ई-सकाळच्या बातमीचा परिणाम; वेळ नदीवरील खचलेला पूल रातोरात दुरुस्त, वाहतूक पुन्हा सुरळीत

राज्यातील लाखो झोपडपट्टीवासीयांना दिलासा! २०११ पूर्वीच्या झोपड्यांना कायदेशीर मान्यता; महायुती सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT