Electricity Bill Payment esakal
नाशिक

Electricity Payment : सुटीच्या 2 दिवशी वीजभरणा केंद्र राहणारा सुरू!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वीज ग्राहकांना बिलाचा भरणा करणे सुलभ व्हावा, यासाठी २५ व २६ मार्चला साप्ताहिक सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी दिले. (mahavitaran Electricity bill Payment will open on 2 days of holiday nashik news)

त्यानुसार नाशिक परिमंडलांतर्गत नाशिक जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी सुरू राहतील. अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल ॲपवर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा हाताच्या बोटावर उपलब्ध आहेत.

www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून वीजबिल भरता येते. याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पेमेंट वॉलेटचा (पेटीएम, गूगल पे) उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाइन भरणा करण्याची सुविधा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dadar Railway Station: दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलणार, सरकार मोठा निर्णय घेणार; मनसेचा आक्षेप

Dawood Ibrahim: दाऊदच्या मुंबईतील घरावर बुलडोझर, स्थानिकांच्या विरोधानंतर पालिकेची कारवाई ऐनवेळी स्थगित

संस्कृतमध्ये गोल्ड, आता ITIमध्ये देशात टॉपर; रिक्षाचालकाच्या मुलीचं यश, पंतप्रधान मोदी करणार गौरव

Marathi News Live Updates : सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मध्यरात्री तीन तास चर्चा, तरीही तोडगा नाही

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीबाबत अफवा! अनधिकृत लिंकवर क्लिक करू नका; वैयक्तिक माहिती देणे टाळा

SCROLL FOR NEXT