mahindra thars suv car inauguration nashik marathi news 
नाशिक

नव्या साहसी प्रवासासाठी महिंद्रची ‘थार’ सुसज्ज; या दिवशी येणार बाजारात

सतिष निकूंभ

नाशिक/सातपूर : सर्वथा नव्या रूपातील ‘थार’चे अनावरण करून आज आम्ही पुन्हा इतिहास लिहिला आहे. आमच्या ‘एसयूव्ही’च्या वारशाचा आम्हाला अभिमान आहे. १९५०पासून आपल्या सैन्यदलाची सेवा करीत देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास या एसयूव्ही कायम सज्ज असतात. त्याचवेळी साहस व जीवनशैली यांचे प्रतीक म्हणूनही त्या दिमाखात वावरतात. नवी थार ही मजा, स्वातंत्र्य यांची अभिव्यक्ती करते. नव्या साहसी प्रवासासाठी ती अगदी सुसज्ज आहे. थारच्या पारंपरिक चाहत्यांना ही नवीन गाडी आकर्षित करेलच, शिवाय थार आपल्या मालकीची असावी, अशी इच्छा बाळगणाऱ्या सर्वांना ती आनंद देईल, असे महिंद्र ॲन्ड महिंद्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवन गोयंका यांनी सांगितले. 

कच्च्या रस्त्यांवर धावण्याची उत्कृष्ट क्षमता व आयकॉनिक डिझाइनचा अनोखा संयोग असलेल्या महिंद्र ॲन्ड महिंद्रतर्फे ‘थार’ या नव्या रूपातील ‘एसयूव्ही'चे शनिवारी (ता. १५) मोठ्या दिमाखात अनावरण झाले. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की थारमध्ये जागतिक दर्जाची एसयूव्ही असून, कार्यक्षमता, आरामदायीपणा, तंत्रज्ञान व सुरक्षा यांबाबत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. नवीन ‘थार’ हे वाहन येत्या २ ऑक्टोबरला बाजारात सादर करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी नमुद केले. महिंद्र ॲन्ड महिंद्रचे ऑटो ॲन्ड फार्म सेक्टर्सचे कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर म्हणाले, की संपूर्णपणे नवीन असलेली ही थार तिच्या बँडचे मूल्य वाढविणार आहे. तिच्या पूर्वीच्या चाहत्यांनाच नव्हे, तर नवीन ग्राहकांनाही ती आकर्षित करेल.  

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT