Damage to the maize crop in the Phad Horticulture area here. esakal
नाशिक

Rain Crop Damage News : मक्याचे उत्पादन घटणार; अतिपावसामुळे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

नामपूर (जि. नाशिक) : येथील सुमारे पाचशे एकर पाटस्थळ क्षेत्रातील मक्याचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिपावसामुळे मक्याच्या झाडाची मुळे सडून मक्याची वाढ खुंटल्याने उत्पादकतेवर विपरीत परिणाम झाला आहे. परिणामी, उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

नामपूर परिसरातील पाटस्थळ क्षेत्राचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी सहकारमहर्षी जयवंतराव सावंत गटाचे नेते विलास सावंत, नामपूर सहकारी सोसायटीचे अध्यक्ष उत्तम सावंत, संचालक प्रवीण सावंत यांनी बागलाण तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. नामपूरला स्वातंत्र्यपूर्व काळापासून फड बागायत पद्धत अस्तित्वात आहे. (Maize production will decrease crop Damage due to heavy rains in nampur Nashik Latest Marathi News)

हरणबारी धरणाच्या आवर्तनाद्वारे रब्बी हंगामासाठी नामपूरमधील शेतीला कालव्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मोसम नदीच्या परिसरातील सुमारे पाचशे एकर क्षेत्र ओलीताखाली येते. मका पिकाला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी जून महिन्यात मक्याचा पेरा घेतला. परंतु, यंदा सुरवातीपासूनच पावसाचा कहर असल्याने मक्याच्या पिकाची अक्षरशः माती झाली आहे.

शेतकऱ्यांना यंदा पहिल्यांदा ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. यंदा मार्च महिन्यापासून साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याला भाव नाही, तेल्या रोगाने डाळिंबबागा संकटात आहेत, खरिपाच्या हंगामात मजुरीचा खर्चही निघणार नाही, अशी वस्तुस्थिती असल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशा प्रतिकूल परिस्थितीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे महसूल आणि कृषी विभागाने याबाबत गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT