major-losses-of-farmers-and-labourers-due-to-floods esakal
नाशिक

पूर आला अन् संसार सारा वाहून गेला...

दीपक घायाळ

विंचूर (जि. नाशिक) : रात्री मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक पाण्याचा जोरदार लोंढा आला आणि झोपड्यांमध्ये घुसला, मात्र समयसूचकता दाखवत मजूर कुटूंबे संसार सोडून पळत सुटले, संसार वाहून गेला असला तरी सुदैवाने सर्वांचा जीव मात्र वाचला. पावसामुळे काल रात्रीच्या सुमारास विंचूर ग्रामपालिकेचा जुना पाणीपुरवठा बंधारा फुटल्याने बंधाऱ्या लगतच्या पंधरा कुटुंबांवर मोठे संकट कोसळले होते, मात्र त्यातून ते बचावले.

मजूरांच्या झोपड्या गेल्या वाहून

मुसळधार पावसामुळे विंचूर व लासलगाव परिसरातील नद्यानाले, दुथडी भरुन वाहत होते. पाण्याचा प्रवाहाचा वेग इतका प्रचंड होता, की त्याने लासलगाव येथील प्रतापसागर हा बंधारा फुटला. हा पाण्याचा लोंढा मोठ्या प्रमाणावर विंचूरच्या बंधाऱ्यात आल्याने विंचूरचा जुना पाणीपुरवठा बंधाराही फुटला. बंधाऱ्यालगत पंधरा ते सोळा कुटुंबांची वस्ती आहे. या वस्तीवरील मजूर झोपलेले असतांना रात्री दहाच्या सुमारास फुटलेल्या बंधाऱ्याचे पाणी अचानक मजूरांच्या वस्तीमध्ये घुसल्याने मजूर जागे झाले अन जीव घेऊन पळाल्याने जीव वाचला. मात्र झोपड्यांमध्ये असलेले अन्नधान्य, भांडे, गँस, दूरदर्शन संच, भ्रमणध्वनी, कपडे, आदी संसार उपयोगी साहित्यांंसह झोपड्या वाहून गेल्याने मजूरांचे संसार उघड्यावर पडले आहेत.

शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

सोमेश्वर दरेकर या शेतकऱ्यांचे वीस फूट रुंद व तीस फुट लांबीचे पत्र्याचे शेडही या पुराच्या पाण्यात वाहून गेले. या शेडमध्ये देखील सोमेश्वर दरेकर यांच्याकडे कामास आलेले मजूर झोपलेले होते. मात्र त्यांना पुराच्या पाण्याचा अंदाज आल्याने त्यांनी वेळीच मजूरांना सुरक्षित स्थळी हलविल्याने पुढील अनर्थ टळला. बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी घुसल्याने शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा, कांदा, मका, सोयाबीन आदी शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT