esakal
नाशिक

Nashik News: इटलीच्या यांत्रिकी झाडूंद्वारे प्रमुख रस्त्यांची झाडलोट! 160 किलोमीटर रस्ते होणार चकाचक

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम ’ अंतर्गत महापालिकेकडून चार यांत्रिकी झाडूंच्या माध्यमातून रस्त्यांची झाडलोट केली जाणार आहे. जवळपास १६० किलोमीटर रस्ते यंत्रामार्फत झाडले जाणार आहे.

त्यामुळे जवळपास दिडशे सफाई कर्मचारी नव्याने उपलब्ध होणार असून त्यांच्याकडून शहराच्या अंतर्गत भागातील रस्त्यांची झाडलोट करण्याचे नियोजन आहे. यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून शहरातील प्रमुख रस्त्यांची झाडलोट केली जाणार आहे. (Major roads cleared by Italy mechanical brooms! 160 km roads will be shiny Nashik News)

‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम’अंतर्गत महापालिकेला प्राप्त झालेल्या निधीतून विविध उपक्रम राबविले जात आहेत.

यात हवा गुणवत्ता नियंत्रणाबरोबरचं रोजचे निरीक्षण नोंदविण्यासाठी केंद्र उभारणे, विद्युतदाहिनी बसविणे, बांधकाम डेब्रिज विल्हेवाट प्रकल्प, दुभाजकांमध्ये शोष वनस्पती, एकीकृत सिग्नल प्रणाली, सुलभ शौचालयांवर सोलर रुफ टॉप बसविणे आदी कामे होणार आहे.

यांत्रिकी विभागाकडून रस्ते झाडण्यासाठी यांत्रिकी झाडू खरेदी करण्यात आले. इटलीहून यांत्रिकी झाडूंची डिलिव्हरी झाली आहे. २० ऑगस्ट २०२१ ला सहा विभागात यांत्रिक झाडू खरेदीचा निर्णय घेण्यात आला.

पाच वर्षासाठी देखभाल-दुरुस्तीसह ३३ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव महासभेवर मंजूर करण्यात आला. एप्रिल २०२३ मध्ये कार्यारंभ आदेश दिले. ऑक्टोबरमध्ये यांत्रिकी झाडू पुरविण्याची मुदत संपुष्टात येत असल्याने त्यापूर्वी महापालिकेला यांत्रिकी झाडू प्राप्त होतील.

शहरातील २१५० किलोमीटर लांबीचे रस्ते आहे. एका यांत्रिकी झाडूसाठी दोन कोटी सहा लाख रुपये असे एकूण बारा कोटी ३६ लाख रुपये खर्च होणार आहे.

पुढील पाच वर्षाच्या कालावधीत ऑपरेशन, देखभाल- दुरुस्ती, इंधन, मनुष्यबळ पुरविण्यासाठी दरमहा पाच लाख ८५ हजार ७०० रुपये खर्च होणार आहे. पाच वर्षासाठी २१ कोटी आठ लाख रुपये खर्च होईल.

साडेतीन मीटर रुंद रस्त्यावर एका यांत्रिकी झाडूमार्फत ४० किलोमीटर प्रमाणे प्रतिदिन १६० किलोमीटर रस्त्याची सफाई केली जाणार आहे. गोळा केलेला कचरा वहन ऑपरेटरमार्फत केले जाणार आहे.

रात्रीच्या वेळी स्वच्छता

सध्या २८०० सफाई कर्मचारी व आऊटसोर्सिंगचे सातशे कर्मचाऱ्यांमार्फत सफाई होते. एका सफाई कर्मचाऱ्याकडून दोन्ही बाजूने पाचशे मीटर अशी साधारण एक किलोमीटर रस्ते झाडलोट अपेक्षित आहे.

यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून सफाई सुरू झाल्यास १६० मनुष्यबळ वाचेल. ते मनुष्यबळ अंतर्गत रस्त्यांची झाडलोट करण्यासाठी वापरले जाणार आहे. रस्ते झाडताना धुळ उडते. त्याचबरोबर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने यांत्रिकी झाडूमार्फत रात्री स्वच्छता केली जाणार आहे.

या प्रमुख रस्त्यांची सफाई

- अशोकस्तंभ ते गंगापूर गाव.

- मुंबई नाका ते अशोकस्तंभ.

- सीबीएस ते कॅनडा कॉर्नर.

- कॅनडा कॉर्नर ते भोसला गेट.

- त्र्यंबक नाका सिग्नल ते सातपूर गाव.

- गडकरी चौक ते तिडके कॉलनी.

- चांडक सर्कल ते मुंबई नाका.

- महात्मा गांधी रस्ता, मेनरोड, नेहरू गार्डन, शालीमार.

- पंचवटी कारंजा ते रविवार कारंजा.

"सहा विभागांसाठी चार यांत्रिकी झाडू खरेदी करण्यात आले आहे. इटलीहून बोटीने डिलिव्हरी झाली असून, लवकरच महापालिकेच्या ताब्यात मिळतील."

- बाजीराव माळी, कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग.

"मुख्यत्वे शहरातील बारा मीटर रुंदीपुढील रस्त्यांची स्वच्छता यांत्रिकी झाडूमार्फत होईल व रात्रीच्या वेळी स्वच्छता होईल."

- डॉ. आवेश पलोड, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nipah Virus Alert : सावधान! पश्चिम बंगालमध्ये आढळले ‘निपाह’ विषाणूचे रूग्ण; केंद्र सरकारकडून हालचालींना वेग

Pune News : सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचा एल्गार; बिनविरोध निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले!

Bhogi Horoscope : भोगीनंतर 'या' 5 राशींचे भाग्य बदलणार; अचानक मिळतील पैसे, रखडलेली कामे पूर्ण होणार अन् ऑफिसमधून मिळेल खुशखबर

PMC Abhay Yojana : पुणेकरांनो घाई करा! अभय योजनेचे शेवटचे ७२ तास शिल्लक; ७५ टक्के सवलत गमावू नका!

Vande Bharat Sleeper Train: प्रतीक्षा संपली! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ शनिवारपासून धावणार

SCROLL FOR NEXT