Makar Sankranti Rituals esakal
नाशिक

Makar Sankranti Ritual : संक्रांतीचे वाण खरेदीसाठी महिलांची बाजारपेठेत गर्दी; पर्यावरणपूरक वाणाला पसंती

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : संक्रांतीनंतर होणारे महिलांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठरलेला असतो. त्याची तयारी १५ दिवसांपासून सुरू होते. त्यात वाण कसे वेगळ्या पद्धतीचे असेल, याकडे महिलांचा कल असतो. त्यासाठी पिंपळगाव शहरातील बाजारपेठेतही विविध पर्याय उपलब्ध असून, त्याची खरेदी करण्यासाठी महिलांची बाजारपेठेत गर्दी होत आहे.

तिळ व गूळ एकत्र करून खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. हिवाळ्यात याचा शरीराला फायदा होतो. याच गोष्टीचा विचार करता विक्रेत्यांनी तिळाची व मिक्स ड्रायफ्रूटच्या खरेदी करण्यासाठी महिलांची बाजारपेठेत गर्दी होत आहे.

चिक्की तसेच गुळाचे हॅम्पर्सही बनविले तीळ आणि गूळ एकत्र करून आहेत. दहा रुपयांपासून ते पाचशे असतात. त्याबरोबरच तिळगुळाच्या रुपयांपर्यंतच्या वाणाच्या वस्तू उपलब्ध आहेत. तिळगुळासोबत शेंगदाण्याची, तिळाची आणि मिक्स ड्रायफ्रूटच्या चिक्कीलाही मोठी मागणी आहे.

हेही वाचा: प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हळदी-कुंकू तसेच संक्रांतीला पाच, सात, अकरा, एकवीस याप्रमाणे महिलांना बोलावून वाण देण्यात येते. वाण म्हणजे हळदी कुंकवात भेटवस्तू देणे. अनेक घरातील महिला संक्रांतीच्या निमित्ताने देतात. त्यात लहान वस्तू ज्या घरात उपयोगी येणाऱ्या किंवा महिलांच्या कामात येणाऱ्या असतात.

तसेच कोणी हातरुमालाबरोबर गजरा, प्लॅस्टिकच्या बाऊलमध्ये तिळगूळ टाकून देतात. वस्तूमध्ये विविध प्रकार बाजारात आले आहेत. त्यात ज्वेलरी बॉक्स, छोट्या पसेंस, लिपस्टिक्स, टिकल्यांचे पाकीट, छोटे-मोठे डबे, हॅकी, दागिने, रेसिपी बुक, साडी कव्हर, घर साफ करण्याचे हँड डस्टर या प्रकारच्या वस्तू बाजारात आहेत.

पर्यावरणपूरक वाणाला पसंती

■ प्लास्टिक पिशव्यांना पर्यायी कापडी पिशव्यांमध्ये प्रचंड वैविध्य आले आहे. वाण म्हणून देण्यासाठी अशा पिशव्या मोठ्या संख्येने विकत घेण्यासाठी महिला बचतगटांना मिळाले. यामुळे गरजू महिलांना रोजगार मिळाला आहे. छोटी घडी होणाऱ्या पिशव्यांना पसंती मिळते. तसेच, भाज्यांसाठी कप्पे असलेल्या कापडी पिशव्यांचीही निवड वाण देण्यासाठी केली जात आहे.

पेपरक्विलिंग हा सध्याचा कलात्मक प्रकार संक्रांतीच्या वाण यादीत आला. यात तयार होणाऱ्या दागिन्यांचे सेट संक्रांतीच्या वाण संस्कृतीला पर्यावरणपूरक 'टच' देत आहेत. अशा प्रकारचे दागिने बनविणाऱ्या महिलांना सध्या 'ऑर्डर' आहे. कागदाच्या लगद्यापासून बनविलेले कॅसेरोल, पॉट, मूर्ती, वॉलहँगिंग, तोरण वाण म्हणून देताना पर्यावरण जपण्याचा संदेशही दिला जात आहे.

''मिनी मेटलचे बास्केट, आर्टिफिशयल फुलांचा छल्ला त्याबरोबरच पर्यावरणपूरक वाणांना मोठी पसंती मिळते आहे. काही महिलांनी प्री-ऑर्डर्स देऊनच वाण दागिन्यांनाही मोठी मागणी आहे.'' - नितीन लोढा, (विक्रेता)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT