malegaon corona free patient.jpg 
नाशिक

दिलासादायक! मालेगावात कोरोना पाय पसरवत असताना...दुसरीकडे मात्र 28 रुग्ण कोरोनामुक्त

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव) शहरात कोरोनाचा उद्रेक सुरू असतांनाच, गेल्या आठवड्यात कोरोनामुक्त होत असलेल्या रूग्णांची संख्याही वाढते आहे. रुग्णालयातील डॉक्टरांचे परिश्रम, परिचारिका, वॉर्डबॉय आदींचे सहकार्य, आरोग्य कर्मचारींची अहोरात्र मेहनत आणि वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद देणारे रुग्ण याचा प्रत्यय म्हणूनच 26 एप्रिल ते 4 मे पर्यंतच्या 9 दिवसात 28 रुग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती आयुक्त त्र्यंबक कासार यांनी दिली आहे. 

रमजान पर्वाच्या सुरवातीलाच तीन रूगण कोरोनामुक्त

शहरवासीयांसह सर्वांसाठी ही दिलासादायक बाब आहे. येथील बाधित रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी रुग्ण उपचारासाठी वेळेवर दवाखान्यात आले, तर त्यांना बरे करण्याची पूर्ण क्षमता आरोग्य प्रशासनात आहे. उपचारासाठी दाखल रुग्णालयातील सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत असून, इतर सर्व कोरोना रुग्णही या रुग्णांप्रमाणे लवकर बरे होतील, बरे होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, सूचनांचे पालन करा, नक्कीच सर्वांना लवकर दिलासा मिळेल. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. भीती न बाळगता अथवा गैरसमज न ठेवता आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने दवाखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री. कासार यांनी केले आहे. 26 एप्रिलला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आणि पवित्र रमजान पर्वाच्या सुरवातीलाच तीन रूगण कोरोनामुक्त झाले होते. 

नागरिकांनी प्रशासनाच्या सर्व सूचना पाळल्या, काळजी घेतली, सामाजिक अंतर पाळले, अफवांना बळी न पडल्यास लवकरच आपण हे युद्ध जिंकून मालेगाव शहर कोरोनामुक्त करू म्हणून प्रशासनास सहकार्य करा सूचनांचे पालन करा. आपली व आपल्या परिवाराची आणि पर्यायाने आपली गल्ली, भाग व शहराची काळजी घ्या. कोरोनाविरुद्धच्या युद्धात एक स्वयंसेवक सैनिक म्हणून घरी राहूनच सहभागी व्हा. असे आवाहन उपायुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT