coronavirus.jpg 
नाशिक

BREAKING : कोरोना पॉझिटिव्हमध्ये शंभरी पार करणारा मालेगाव ठरला राज्यातील पहिलाच तालुका! आणखी ५ पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

नाशिक/ मालेगाव : उत्तर महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉट मालेगावमध्ये बाधितांचे शतक झाले आहे. गुरुवारी सकाळी ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे शहरातून कोविड-१९ चा संसर्ग झालेल्या व्यक्तीची संख्या १०१ झाली. बुधवारी (ता. २२) दिवसभरात १०६ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. परंतु मालेगावकरांच्या दृष्टीने बुधवार तसा काहीसा दिलासादायक म्हणावा लागेल.. तर एका बाधितासह चौघांचा मृत्यू झाला होता. परंतु, गुरुवारी सकाळी ४७ वर्षीय दोन, ३७, ७० व ४४ वर्षीय अशा पाच संशयितांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. हे पाचही हाय रिस्क संपर्कातील व वेळीच क्वारंटाइन केलेले होते. दुसरीकडे मृतांची आकडेवारी ही दशकस्थानी पोहोचली आहे. शहरात ८ एप्रिलला पहिले पाच रुग्ण आढळले होते. हा आलेख शंभरीपर्यंत उंचावण्यास फक्त १५ दिवस लागले. यावरून शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव किती झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट होते.

 मालेगाव शहरातील कोरोनाबाधित रुग्ण व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य शासनाने मालेगाव शहरासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. बुधवारी (ता. २२) जीवन हॉस्पिटल व सामान्य रुग्णालयात उपचारार्थ प्रत्येकी दोन, असे चार जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी (ता. २१) मध्यरात्रीपर्यंत आलेल्या रिपोर्टमध्ये ११ रुग्ण पॉझिटिव्ह निष्पन्न झाले होते. मालेगावात बुधवारी झालेल्या मृतांमध्ये नयापुरा भागातील ४५ वर्षीय पुरुष व हाजी अहमदपुरा भागातील ४९ वर्षीय महिला, बेलबाग भागातील दोन जणांचा समावेश आहे. बुधवारी मृत झालेल्या पुरुषाला मधुमेहचा त्रास होता. तीन दिवसांपूर्वी त्यांना जीवन हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT