Unai Malegaon bus coming from Gujarat state, the situation of senior citizens who underwent eye surgery when it broke down at Hawa Dang. esakal
नाशिक

MSRTC News : मालेगावची बस गुजरातच्या जंगलात बंद पडली!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मालेगाव परिवहन आगारातील बस (एम एच 14 बीटी 0755) गुजरातमधून गुरूवारी ऊनईवरून मालेगावकडे येत असताना हवाडांगच्या पुढे दुपारी तीनच्या सुमारास जंगलामध्ये बंद पडली. स्टार्टर खराब व बेल्ट तुटल्याने एसटी जागेवर थांबली.

एसटीत बिघाड झाल्याची माहिती मालेगाव आगारात देण्यात आली, मात्र अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन चालक व कंडक्टर यांना कुठलेही सहकार्य न केल्यामुळे चालकाने अक्षरशा हवाडांग येथे जाऊन फिटर आणला, मात्र रात्र खूप झाल्याने फिटरही अव्वाच्या सव्वा किंमत सांगू लागल्याने पुन्हा आगाराला माहिती देण्यात आली. (Malegaon bus stopped in forest of Gujarat Malegaon authorities give fake reply Nashik News)

तरीही अधिकारी कुठलं सहकार्य करत नसल्याने चालकासह महिला कंडक्टर आणि ज्येष्ठ प्रवासी अक्षरशः वैतागून गेले. रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू होते.

उनई मालेगाव बसमध्ये मालेगाव सटाणा परिसरातील ज्येष्ठ नागरिक हे वाजदाहून डोळ्यावर शस्रक्रिया करून प्रवास करत होते, मात्र बसमध्ये बिघाड झाल्याने त्यांचे अतोनात हाल झाले.याचवेळी ‘सकाळ’ चे साल्हेरचे बातमीदार भास्कर बच्छाव कामानिमित्त हवाडांग येथे जात असताना त्यांना एसटीच्या आडोशाला व काही उन्हामध्ये डोळ्यांना पट्टी बांधून बरेच ज्येष्ठ नागरिक वाहक सारिका वाघ यांच्याशी बाचाबाची करताना दिसले.

बच्छाव यांनी मध्यस्थी करून सर्व ज्येष्ठ नागरिकांना शांत केले. बस मध्ये बिघाड होऊन बरेच तास झाल्याने काही ज्येष्ठ नागरिकांनी मालेगावकडे जाणाऱ्या वाहनांना हात देऊन निघण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा एसटीमधील संपूर्ण प्रवासी निघून जात असताना वाहक सारिका वाघ यांना रडू कोसळले. ज्येष्ठ नागरिक दशरथ उशिरे (जळकू) बाळू निकम (निंबोळा), रामदास अहिरे (भुयाने), रघुनाथ शिंदे (जळकू) यांनी महिला कंडक्टर वाघ यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.

मात्र जसजशी रात्र होत होती तसतशी त्यांच्यामध्ये घबराट होत होती. रात्री उशिरा बस चालक परशुराम सोर यांनी बस दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरूच ठेवले, मात्र यश येत नव्हते. मध्यरात्री महिला कंडक्टर व ज्येष्ठ नागरिकांनी यांनी पुढचा प्रवास केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"वाजद्याला डोळ्याच्या ऑपरेशनसाठी गेलो होतो. दुपारी उनई मालेगाव बसने प्रवास करत असताना बस गुजरात राज्यामध्ये बंद पडली. संबंधित चालक व महिला वाहकांनी आगाराशी संपर्क केला, मात्र अधिकारी कुठलेही दखल न घेता उडवाउडीचे उत्तर देत होते.

रात्र झाली तसे प्रवासी मिळेल त्या वाहनाने घराकडे निघून जात असल्याने महिला वाहक रडायला लागली, आम्ही तिला धीर दिला. मात्र रात्र वात गेली तसा आमचाही धीर सुटला."

- दशरथ उशिरे ज्येष्ठ नागरिक जळकू, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT