malegaon signal.jpg 
नाशिक

मालेगावी पहिल्यांदाच सिग्नल कार्यान्वित! वाहतुकीला लागणार शिस्त

प्रमोद सावंत

मालेगाव कॅम्प (जि.नाशिक) : शहरातील प्रमुख चौकात उभारण्यात आलेल्या सिग्नलमुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊन शिस्त लागण्यास मदत होईल, असा विश्वास कृषिमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (ता. २३) व्यक्त केला. 
सिग्नलमुळे वाहतुकीला शिस्त लागणार : भुसे 

भुसे म्हणाले, की शहरात नव्यानेच राबविण्यात येणाऱ्या यंत्रणेमुळे वाहतूक व्यवस्थेवर सुरवातीला ताण पडेल. यातील अनुभवांनी पुढील काळात सुधारणा करता येतील. सिग्नल यंत्रणेमुळे वाहतूक पोलिसांबरोबर नागरिकांवरदेखील मोठी जबाबदारी राहणार आहे. शहरातील प्रमुख चौकातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी पर्यायी रिंग रोड प्रस्तावित करण्याच्या सूचना या वेळी दिल्या. 

२०२१ हे वर्ष मालेगावच्या विकासाचे वर्ष ठरेल,
शहरात प्रमुख सात ते आठ मुख्य रस्ते असून, त्यावर महापालिकेने लक्ष केंद्रित करावे. या रस्त्यांचा विकास करून नागरिकांना भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शहराच्या विकासासाठी शासनस्तरावरून भरीव निधी मंजूर करून २०२१ हे वर्ष मालेगावच्या विकासाचे वर्ष ठरेल, असा विश्‍वास भुसे यांनी व्यक्त केला. 

महापालिकेने विशेष तरतूद करण्याचे आवाहन

विकास निधीतून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची देखभाल व दुरुस्तीसाठी महापालिकेने विशेष तरतूद करण्याचे आवाहन नगरसेवक बोरसे यांनी प्रास्ताविकात केले. श्री. पाटील, श्री. बिडकर, शान-ए-हिंद, युनूस इसा यांनी मनोगत व्यक्त केले. नगरसेवक ॲड. गिरीश बोरसे यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या वाहतूक सिग्नलच्या लोकार्पण कार्यक्रमात मंत्री भुसे बोलत होते. या वेळी उपमहापौर नीलेश आहेर, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, महापालिकेचे आयुक्त त्र्यंबक कासार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, विरोधी पक्षनेत्या शान-ए-हिंद निहाल अहमद, माजी महापौर हाजी युनूस इसा, सखाराम घोडके, मुस्तकीम डिग्निटी, भीमा भडांगे, नंदकुमार सावंत, एजाज बेग, शफीक अन्सारी, दीपाली वारुळे आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : मुंबईत पावसाची संततधार सुरु, सखल भागांत पाणी साचले

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT