powerloom.jpg 
नाशिक

VIDEO : मालेगावात यंत्रमाग सुरू झाल्याने मिळाले हातांना काम...चक्क 'इतके' मीटर कापड तयार!

गोकुळ खैरनार : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव) शहरात यंत्रमागाचा खडखडाट सुरू होऊन पहिल्या सहा दिवसांत 60 हजार यंत्रमागावर सुमारे इतके मीटर कापड तयार झाले. यंत्रमाग व सायझिंगमधील कामगार, मुकादम, हमाल, मालवाहू रिक्षाचालक आदी 40 हजार जणांना रोजगार मिळाला आहे. 

दोन लाखांवर यंत्रमागांचा खडखडाट

शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची पुनर्रचना केल्यामुळे शनिवार (ता. 6)पासून सुरू होणाऱ्या आठवड्यात आणखी यंत्रमाग सुरू होतील. दरम्यान, यंत्रमाग सुरू झाल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत पूर्व भागात आळा बसू लागला आहे. येथील यंत्रमाग अडीच महिन्यांपासून बंद होते. जवळपास दोन लाखांवर यंत्रमागांचा खडखडाट मंदावल्याने व त्यातच कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने शहरात नैराश्‍य पसरले होते. हातावर पोट असलेल्या लाखो मजुरांची आर्थिक कोंडी होऊन दयनीय अवस्था झाली होती. येथे शनिवारपासून यंत्रमाग सुरू झाले. पहिल्याच दिवशी 18 हजार यंत्रमागांची चाके फिरली. यानंतर रोज यंत्रमाग सुरू होण्याची संख्या वाढत गेली. गुरुवारअखेर (ता. 4) 55 ते 60 यंत्रमाग सुरू झाले. त्यामुळे हजारो कामगारांना काम मिळाले. 

४० हजार हातांना मिळाले काम

यंत्रमागावर अवलंबून असणारे सायझिंग मजूर, मुकादम, हमाल, माल वाहतूक करणारे वाहनचालक आदींची रोजीरोटीही सुरू झाली. सर्व घटक विचारात घेता 40 हजार जणांचा रोजगार सुरू झाला आहे. येथील यंत्रमाग बारा-बारा तासांच्या दोन शिफ्टमध्ये चालतात. सध्या आठ-आठ तासांच्या दोन शिफ्ट सुरू आहेत. एका यंत्रमागावर आठ तासांत 30 मीटर कापड तयार होते. दोन शिफ्टमध्ये एका यंत्रमागावर 60 मीटर कापड तयार होते. यंत्रमाग एक-दोन दिवस मागे-पुढे सुरू झाले. त्यामुळे पहिल्या आठवड्यात साधारणतः 30 लाख मीटर कापड तयार झाल्याचा अंदाज आहे. 

"सकाळ'ने वेधले होते लक्ष 

कोरोना परिस्थितीनंतर "सकाळ'ने मालेगावच्या झोपडपट्टीतील यंत्रमाग कामगारांची व्यथा "मालेगांव की घुटन' या वृत्तमालिकेतून मांडली होती. यंत्रमाग बंद असल्याने कामगारांची सोशल डिस्टन्स पाळताना होणारी फरपट वस्तुनिष्ठ स्वरूपात मांडली होती. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी याची दखल घेत यंत्रमाग सुरू करण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उद्योग सुरू झाले. यामुळे मजुरांना काम मिळून शहराची थांबलेली आर्थिक चक्रे फिरू लागली. शिवाय कोरोनाचा प्रभाव कमी झाला. गेल्या सहा दिवसांत शहरातील पूर्व भागात केवळ 20 रुग्ण आढळले. तुलनेने पश्‍चिम भागात वाढणारी रुग्णसंख्या चिंता वाढविणारी आहे. 

प्रतिबंधित क्षेत्रांची पुनर्रचना केल्याने आणखी यंत्रमाग सुरू होतील. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली येथील व्यवहार सुरळीत झाल्यास मालेगावच्या कापडाला मागणी वाढेल. कच्चा माल मिळण्यास अडचणी येत आहेत. सर्व सुरळीत झाल्यास 24 तास उत्पादन घेणे शक्‍य होईल. महिनाअखेरपर्यंत उद्योग बऱ्यापैकी रुळावर येईल. - युसूफ इलियास, अध्यक्ष, पॉवरलूम कृती समिती, मालेगाव  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT