Customers enjoying sorbati tea at Salam Chacha Street in Malegaon. esakal
नाशिक

Nashik News: सरबती चहा घालतोय नागरिकांना भुरळ! अवघ्या 4 रुपयांना भागते तलफ

थंडीत शरबती चहाच्या ट्रेंड सुरू झाला आहे. अवघ्या चार रुपयाला मिळणाऱ्या चहासाठी गर्दी होत आहे.

जलील शेख

मालेगाव : सध्या सगळीकडे चहाचे वेगवेगळे ट्रेंड आले आहेत. शेतकरी, आमदार, गुळाचा आदीं ट्रेंडनी ग्रामीण भागातील नागरिकांना भुरळ पाडली आहे. मालेगावची रीत थोडी न्यारी आहे. येथील महामार्गावर गुळाचा चहा लोकप्रिय होत आहे.

येथे नवनवीन आलेल्या चहाचे प्रकार विफल ठरले. शहरात अल्पदरात उत्तम दर्जाचा चहा मिळत असल्याने स्वस्तात मस्त मिळणाऱ्या चहाने अनेकांना भुरळ घातली आहे. यातच येथे थंडीत शरबती चहाच्या ट्रेंड सुरू झाला आहे. अवघ्या चार रुपयाला मिळणाऱ्या चहासाठी गर्दी होत आहे. (malegaon Sharbati tea to citizens tempting costs just Rs 4 Nashik News)

मालेगाव अन्‌ चहा यांचे अतूट नाते आहे. चहाप्रिय असलेल्या शहरात चोवीस तास चहा उपलब्ध असतो. येथे चहाच्या लहान-मोठ्या शेकडो हॉटेल्स, टपऱ्या आहेत.

चहामुळे येथील प्रत्येक हॉटेलवर नेहमीच गर्दी असते. सरबती चहा फायदेशीर व गुणकारी असल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जाते.

येथे चंदनपुरी गेट, आयेशानगर, आझादनगर, डेपो, सलामचाचा रोड, कुसुंबा रोड यासह विविध भागात सरबती चहाच्या हातगाड्या लावल्या जात आहे.

सरबती चहाची थंडीत दुप्पटीने विक्री होत आहे. २०१० मध्ये येथे अवघ्या एक रुपयाला मिळणारा चहा सध्या चार रुपयाला मिळत आहे. सरबती चहा अगदी कमी खर्चात तयार होतो, त्यामुळे सध्या काही ठिकाणी तीन ते चार रुपयाला चहाची विक्री होत आहे.

असा तयार होतो सरबती चहा

सरबती चहा बनविताना सुरवातीला काळा चहा बनविला जातो. यात गवती चहा, अद्रक, गूळ, साखर, चहा मसाला व सरबती चहा पावडर टाकून तयार होतो.

चहा तयार झाल्यावर ग्लासमध्ये लिंबू, चाट मसाला, काळे मीठ टाकले जाते. चहा पिल्याने सर्दी, खोकला व इतर आजाराला गुणकारी असल्याने ग्राहकांच्या कल वाढत आहे.

"पंधरा वर्षांपासून वडील हा व्यवसाय करीत होते. हा हंगामी व्यवसाय आहे. स्वस्तात मिळत असल्याने ग्राहकांकडून मागणी चांगली आहे. विक्रीत दुप्पटीने वाढ झाली आहे."

- मोहम्मद मतीन, सरबती चहा विक्रेता

"पावसाळ्यात व थंडीत मिळणाऱ्या या चहाची चव वेगळी असते. सरबती चहा वर्षातून एकदाच मिळतो. त्यामुळे रोज रात्री जेवणानंतर हा चहा पिण्याची येथे सवय आहे."

- अब्दुल रहमान, मालेगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT