नाशिक

Gram Panchayat Election : मालेगाव तालुक्यात भुसे- हिरे 50-50!; प्रस्थापितांचा दारुण पराभव

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत पालकमंत्री दादा भुसे व भाजपचे युवानेते अद्वय हिरे यांच्या गटाच्या समर्थकांनी प्रत्येकी पाच ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेसला एक तर दोन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची बाजी अपक्षांनी मारली. दाभाडी, पाटणे, सौंदाणे या मोठ्या गावांमध्ये भुसे समर्थकांची सरशी झाली. जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या दाभाडी सरपंचपदाच्या प्रतिष्ठेच्या लढतीत प्रमोद निकम हे दणदणीत मतांनी विजयी झाले. (Malegaon taluka bhuse hirey half half success crushing defeat for established politicians Gram Panchayat Election nashik news)

त्यांनी माजी पंचायत समिती सभापती शशिकांत निकम यांचा पराभव केला. सौंदाणेत युवानेते चेतन पवार यांच्या पत्नी शीतल पवार यांनी माजी बांधकाम सभापती मनीषा पवार यांच्या सासू तर माजी जिल्हा परिषद सदस्य रत्नाकर पवार यांच्या मातोश्री दगुबाई पवार यांचा अडीच हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव केला.

तालुक्यातील दाभाडी, वजीरखेडे, पाटणे, सौंदाणे व मोहपाडा या पाच ग्रामपंचायतींमध्ये भुसे गटाचे सरपंच विजयी झाले. टोकडे, करंजगव्हाण, शिरसोंडी, माल्हणगाव या गावांमध्ये हिरे गटाचे सरपंच विजयी झाले. येथील तहसील कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर सकाळी दहाला मतमोजणीला सुरवात झाली. तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात आली.

रोझे, मोहपाडा, शिरसोंडी, चौकटपाडे व निंबायती या ग्रामपंचायतींची मतमोजणी सकाळी साडेअकरापर्यंत पूर्ण झाली होती. दुसऱ्या फेरीत जाटपाडे, सौंदाणे, करंजगव्हाण, माल्हाणगाव, वजीरखेडे या गावांची मतमोजणी झाली. अखेरच्या फेरीत दाभाडी, टोकडे व पाटणे येथील मतमोजणी करण्यात आली. मतमोजणी केंद्राबाहेर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

गावनिहाय विजयी उमेदवार असे :

दाभाडी : सरपंच - प्रमोद निकम, सदस्य - प्रकाश अहिरे, उषा महिरे, शोभा निकम, बळिराम माळी, सुभाष नहिरे, दीपाली मानकर, हरी निकम, मोनाली वाघ, अभिजित निकम, वृषाली निकम, कुमुदिनी निकम, देवचंद गोऱ्हे, नंदकुमार निकम, ममता गिरासे, प्रभाकर ठाकरे, पूजा गांगुर्डे, पुनम भावसार.

सौंदाणे : सरपंच - शीतल पवार, सदस्य - चंद्रकला पवार, मीना माळी, शुभांगी पवार, महारु सोनवणे, कल्पना अहिरे, रंजना पवार, तात्यासाहेब पवार, सोनाली पवार, प्रवीण छाजेड, उत्तम पवार, रत्ना पवार, शशिकांत पवार, सीमा अहिरे, मनीषा पवार, किरण पवार, युवराज खैरनार, राजसबाई पवार.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

पाटणे : सरपंच - संगीता यशोद, सदस्य - धर्मा सोनवणे, गौरव अहिरे, मीनाबाई त्रिभुवन, रवींद्र निकम, कांतिलाल नहार, योगिता खैरनार, दत्तात्रेय खैरनार, ज्योती खैरनार, रूपाली खैरनार, गणेश खैरनार, कविता पवार, सीमा पगारे, तुकाराम बागूल, प्रमिला सोनवणे, संगीता जाधव.

वजीरखेडे : सरपंच - सुनीता बोरसे, सदस्य - शीतल भदाणे, संदीप भदाणे, निंबाबाई गायकवाड, नानाजी सोनवणे, विठाबाई गांगुर्डे, मंगलबाई पवार, विनोद बोरसे, मनीषा व्याळीज, दिलीप निकम, गंगूबाई अहिरे, वैशाली पाटील.

चौकटपाडे : सरपंच - निर्मला पवार, सदस्य - समाधान पारखे, संगीता जाधव, अरुणा शेवाळे, शैलेश गायकवाड, प्रीती लोखंडे, देवीदास लोखंडे, अलका सरोदे.

टोकडे : सरपंच - कैलास दाभाडे, सदस्य - भावसिंग डिंगर, बेबीबाई चव्हाण, चिंधाबाई दराखा, जयभीम उशिरे, दीपाली वाघ, सुनीता लिद्दड, वसंत ठाकरे, प्रेमाबाई कव्हाड, कल्पनाबाई शेजवळ.

जाटपाडे : सरपंच - भागचंद तेजा, सदस्य - दगा पवार, शैलाबाई वाघ, निंबाबाई जगताप, रामचंद्र मोकळ, प्रभाकर सोनवणे, अरुणा मान, मनसाराम बिसू, सुमनबाई सोनवणे, राधाबाई बिसू.

निंबायती : सरपंच - ताईबाई माळी, सदस्य - गोरखनाथ माळी,

हिरुबाई पवार, जयश्री शेवाळे, मन्साराम शेवाळे, लहानूबाई जगताप, शोभा शेवाळे, नानाजी शेवाळे, वैशाली शेवाळे, चिंतामण शेवाळे, स्वप्नील बावीस्कर, आशाबाई शेवाळे.

शिरसोंडी : सरपंच - सोनाली पवार, सदस्य- संजय पवार, मयूरी पवार, समाधान केशव बोरसे, समाधान संतोष बोरसे, कविता बोरसे, भाऊसाहेब पवार, कविता चव्हाण, मीना वाघचौरे.

रोझे : सरपंच - सुमन गायकवाड, नामदेव उगले, इंदूबाई गायकवाड, सुनंदाबाई उगले, सोमनाथ उगले, हौसाबाई घुगे, जवानसिंग निकम, अहिल्याबाई सांगळे.

मोहपाडे : सरपंच - भगवान बोरकर, सदस्य - रतन बोरकर, लताबाई बोरकर, बिबाबाई डोमाळे, हिरामण आयनोर, सायजाबाई बोरकर, सीताराम बोरकर, विमलबाई बोरकर.

करंजगव्हाण - सरपंच - कविता सोनवणे, सदस्य - जाकीर मन्सूरी, सुवर्णा शेवाळे, सुदाम जाधव, पद्माबाई बोरसे, गणेश जाधव, मनोहर कचवे, कविता ह्याळीज, राजेंद्र बोरसे, अरुणाबाई गांगुर्डे, सविता मालपुरे, नंदकिशोर मालपुरे, मंगला कदम, चित्रा खैरनार.

माल्हणगाव : सरपंच - बाबाजी सूर्यवंशी, सदस्य - नानाजी चव्हाण, पमाबाई चव्हाण, अलकाबाई बच्छाव, भुरा दळवी, निशा गायकवाड, रत्नाकर बच्छाव, ताराबाई अहिर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT