maleagoan esakal
नाशिक

मालेगाव हिंसाचार : एका बड्या नेत्याच्या भावाचा शोध सुरू

सकाळ डिजिटल टीम

मालेगाव (जि.नाशिक) : त्रिपुरा (tripura violence) येथे घडलेल्या घटनेवरून महाराष्ट्रात मालेगावही (malegaon violence) पेटले. त्याचे पडसाद राज्यभर इतर ठिकाणी नांदेड आणि अमरावतीमध्ये पसरले. मात्र आता आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप (video clip) तयार करून व्हायरल केल्याने अनेक भागात वातावरण चिघळले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका नगरसेवकाला बेड्या ठोकल्या आहेत. दोन विद्यमान नगरसेवकांचा शोध पोलिसांकडून सुरू असल्याचे समजते.

एका बड्या नेत्याच्या भावाचा शोध सुरू

मालेगाव हिंसाचार (malegaon violence) प्रकरणी पोलिसांनी पाच वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. त्यात आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करणे, दगडफेक करणे, लोकांची माथी भडकावणे, त्यासाठी कट रचणे असा संशयितांचा शोध सुरू केला आहे. त्यात सर्वजण आजी आणि माजी नगरसेवक आहेत. तसेच दोन विद्यमान नगरसेवक, दोन माजी नगसेवक आणि एका माजी नगरसेवक पुत्राचा समावेश असल्याचं बोललं जातयं. विशेष म्हणजे एका बड्या राजकीय नेत्याचा आतेभाऊही संशयितामध्ये आहे. त्याच्यासह दोन विद्यमान नगरसेवकांचा शोध पोलिसांकडून सुरू असल्याचे समजते.

या नगरसेवकांना बेड्या

मालेगाव हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी नगरसेवक अयाज हलचल, माजी नगरसेवक रहेमान शहा,अवामी पार्टीचे अध्यक्ष रिजवान बॅटरीवाला, नासीर मेहबूब शेखऱ, वसीम अख्तर मोहम्मद सली, अल्ताफ अन्वर शाह, मोहम्मद जाहीद अनिस अहमद, मोहम्मद इमरान आतिक अहमद, साबीर गौहर, सर्फराज जाविद शेख आणि इम्रान सलीम शेख यांच्यासह अनेकांना बेड्या ठोकल्या आहेत.

मागच्या काही दिवसांमध्ये त्रिपुरात (Tripura) दोन समुदायांमध्ये तणाव वाढला आहे. त्रिपुरात मशिदीमध्ये (Mosque) नुकसान केल्याच्या काही घटना घडल्या होत्या. त्याचे पडसाद महाराष्ट्रात (Maharashtra) उमटले. उत्तर त्रिपुरा जिल्ह्यात दोन ते तीन हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यामध्ये मोर्चेकऱ्यांनी मशिदीचं नुकसान केलं होतं. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी महाराष्ट्रात मुस्लिम संघटनांनी ठिकठिकाणी मोर्चे काढले होते. यावेळी हिंसाचार, तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.

यांचा शोध सुरू

मालेगाव हिंसाचार प्रकरणी अनेक संशयित रडावर असून ते फरार आहेत. त्यात युसूफ इलियास, मुस्तकिम डिग्निटी, इम्रान रिजवी, डॉ. रईस रिजवी, सलीम रिजवी, अकील रिजवी, कारी हारुण रिजवी, जाहिद अनिस कच्छी, अफताफ आलम ऊर्फ अर्जुन्या, तौसिफ शेख मुसा, नाविद रज्जा शेख, इब्राहिम रईस शेख, दानिश, अल्ताफ अंधा, जनैद रज्जाक शेख, शकील नमक, तौफिस अहमद, फरदीन लसूणवाला यांचा पोलिसांनी शोध सुरू केला.

त्रिपुरा येथील कथित घटनेवरून महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये असंतोषाचा वणवा पेटला. आता हा वणवा अनेकांनी मुद्दाम जाणून-बुजून आपली पोळी भाजून घेण्यासाठी पेटल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे मालेगावमध्ये याप्रकरणी बहुतांश राजकीय क्षेत्राशी संबंधितांचे अटकसत्र सुरू आहे. त्यातही आजी-माजी नगरसेवकांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनीच हे प्रकरण पेटवल्याचा संशय असून, आतापर्यंत 33 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील काही जणांचा शोध सुरू आहे. त्यासाठी सीसीटीव्ही चित्रणाचा उपयोग केला जात आहे. नगरसेवक अयाज हलचलने एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात त्रिपुरा येथे मुस्लिम नागरिकांवर अन्याय होत आहे. तिथले दंगे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हणत ती क्लिप इतर चौघांच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड केली. 8 नोव्हेंबरला हा प्रकार घडला. आझादनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधित नगरसेवक अयाज हलचलला बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : मुलुंड येथील क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीचं आंदोलन

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT