corona covid.jpg 
नाशिक

धक्कादायक! मालेगावात एकाच कुटुंबातील ६ जण कोरोनाबाधित...परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भिती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक/ मालेगाव : मालेगावात कोरोना विषाणूचं थैमान सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी ६ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. आणि आश्चर्याची बाब म्हणजे संगमेश्वर परिसरातील एकाच कुटुंबातील हे ६ जण असून सर्व रुग्ण हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील कोरोनाबाधित आहेत.  त्यामुळे मालेगावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११५ वर पोहोचली आहे. (गुरुवारी ता.२३) दुपारपर्यत १४ रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यात ६ पुरुष तर ३ महिलांचा सामावेश आहे. सकाळी ५ आणि दुपारी ९ असे एका दिवसात कोरोनाचे १४ रुग्ण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले..  एकट्या मालेगावात कोरोनाने ९ जणांचा बळी घेतला आहे, 

मालेगाव बनला कोरोनाचा 'हॉटस्पॉट'

नाशिक जिल्ह्यातील मालेगावात आतापर्यंत कोरोनाचे ११५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नाशकात १० पॉझिटिव्ह तर ग्रामीण भागात ४ पॉझिटिव्ह आहेत. मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. नागरिकांमध्ये भीती आहे. मात्र, कोणीही गांभीर्याने घेण्यात तयार नाही. दररोज मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत आहेत. आता तर प्रशासनही हतबल झाले आहे. वेळीच कठोर पावलं उचलली नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही.

मालेगावात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. आतापर्यंत मालेगाव शहरात कोरोनाबाधित रुग्णांनी शंभरी गाठली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात मालेगाव शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी देखील कोरोना या प्राणघातक रोगाला कोणीही गांभीर्याने घेण्यास तयार नाही. दररोज मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडून बाजारात गर्दी करत आहेत. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन कमी पडत आहे. तर दुसरीकडे ज्यांच्यावर नागरिकांमध्ये कोरोना हा किती घातक आहे, याची जाणीव करून देण्याची जबाबदारी आहे. असे आजीमाजी लोकप्रतिनिधीनी जनतेला वाऱ्यावर सोडत किरकोळ कारणावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतले आहेत. त्यामुळे आता जर सर्वांनी मिळून कठोर पाऊल उचललं नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही.

मालेगावात कोरोनाचे थैमान सुरूच.संगमेश्वर परिसरातील एकाच कुटुंबातील ०६ कोरोनाबाधित
सर्व रुग्ण हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील...
 नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधित झाले १३०
एकट्या मालेगावचा आकडा पोहोचला ११५ वर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Viral Video : “अरे जल्दी कर, सुबह पनवेल निकलना है” म्हणताच प्राध्यापक भडकले; विद्यार्थ्याची स्टेजवरच धरली गचांडी, VIDEO VIRAL

IND A vs AUS A: भारताच्या विजयात 'मुंबई'कर चमकले! ऑस्ट्रेलियाला पाणी पाजले, मालिकेत १-० ने आघाडी

ती बाहेर मोठी सेलिब्रिटी असेल पण घरी... अपूर्वा नेमळेकरबद्दल काय म्हणाले सासरे; दीर म्हणतात- तिने सहा महिने...

Lalbaugcha Raja: पालखी निघाली राजाची...! लालबागच्या राजाची निरोपाची आरती; डोळे पाणावणारा क्षण VIDEO

Maharashtra Ganesh Visarjan Live: मनाचा तिसरा गुरुजी तालीम मिरवणुकीत ढोल ताशांची अफलातून जुगलबंदी

SCROLL FOR NEXT