Colour Market esakal
नाशिक

Rangpanchami Festival : मालेगावला रंगपंचमीनिमित्त रंगांची उधळण; शेकडो किलो रंगांची विक्री

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात रविवारी (ता.१२) साजऱ्या होणाऱ्या रंगपंचमीच्या पाश्‍र्वभूमीवर येथील मुख्य चौकांमध्ये रंग विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. रंगपंचमीचा उत्साह बाळगोपाळांसह नागरिकांमध्ये दिसून येत आहे.

चिमुरड्यांसह तरुणाई रंग खरेदी करीत आहेत. आतापर्यंत शेकडो किलो रंगांची विक्री झाली आहे. (Malegon bursting with colors on occasion of Rangpanchami Selling hundreds of kilos of colors nashik news)

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

शहर व परिसरात रंगपंचमीचा उत्साह नागरिकांमध्ये दिसून येत आहे. घाऊक बाजारात दीड महिन्यापुर्वीच रंगांची खरेदी-विक्री सुरु झाली होती. व्यापाऱ्यांनी सुरवातीला ५० रुपये किलोप्रमाणे रंग विक्री केला.

सध्या रंगाच्या मालाचा काहीशा प्रमाणात तुटवडा भासल्याने येथे रंगाच्या किलोमागे दहा रुपये वाढले आहेत. येथे लाल, नारंगी, पिवळा, गुलाबी या रंगांना विशेष मागणी आहे. नागरिकांकडून नैसर्गिकरित्या तयार केलेल्या रंगांना नागरिक पसंती देत आहेत. या रंगांमध्ये सुगंधित रंगही विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत.

शहरात चौकाचौकात रंग विक्रीची दुकाने लागली आहेत. लहान मुले रंग खेळण्यासाठी कार्टून पिचकारी, पंप, मोठे पंप, फुगे आदी वस्तू खरेदी करताना दिसत आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी रंगांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पिचकारी साडेतीनशे रुपये डझनपासून विकली जात असल्याचे येथील घाऊक व्यापारी शुभम चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात पुन्हा हिट अँड रन; पाषाण परिसरात भरधाव कारची महिलेला धडक; जागीच मृत्यू

Sangli ZP Election : सांगलीत झेडपीचे वातावरण तापलं उमेदवाराच्या पतीवर प्राणघातक हल्ला, गाडी जाळली; पहाटे ३ वाजता जयंत पाटील घटनास्थळी

'हॉट आहे का?' हॉस्टेलमधील रुममेटचे प्रायव्हेट फोटो, व्हिडीओ मैत्रिणीने प्रियकराला पाठवले

संजय राऊतांना कर्करोगाचं निदान, ऐन दिवाळीत किमोथेरपी; म्हणाले, पहिल्यांदा समजलं तेव्हा हसू आलं

February Monthly Numerology 2026: फेब्रुवारीत प्रेमाची बरसात! ‘हा’ मूलांक असलेल्या लोकांचं लव्ह लाईफ होणार सुपर रोमँटिक

SCROLL FOR NEXT