asha worker.jpg 
नाशिक

संतापजनक! उपसरपंचाकडूनच आशासेविकेला बेदम मारहाण...नेमके काय घडले?

संजीव निकम : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (नांदगाव) 'क्वारंटाइनसाठी आमची नावे आरोग्य विभागाला का कळवली', अशी विचारणा करीत उपसरपंच व त्याच्या मुलाने आशा गटप्रवर्तक महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. २६) मळगाव येथे घडली. सविस्तर प्रकार असा की... 

अशी आहे घटना

 तालुक्यातील मळगाव येथील दहा जण नाशिक येथे नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. अंत्यविधीसाठी गेलेल्यांनी गावात फिरू नका, तुम्ही तुमच्या घरातच क्वारंटाइन व्हावे, असे सांगून आशा कर्मचारीने ही बाब तालुक्याच्या आरोग्य विभागाला कळविली व व्हॉट्‍सॲप ग्रुपवरही माहिती टाकली. याचा राग आल्याने ग्यानदेव आहेर व त्यांचा मुलगा भाऊसाहेब यांनी  आशा गट प्रवर्तक रोहिणी आहेर व त्यांच्या पतीला शिवीगाळ व मारहाण केली. 

गुन्हे दाखल करण्याची मागणी

दरम्यान, कोरोनाशी लढताना ग्रामीण भागात घरोघरी जाऊन सेवा देणाऱ्या नांदगावसह जिल्ह्यातील आशा कर्मचारी व गटप्रवर्तकांवर शारीरिक हल्ले वाढत असल्याने याबाबत संबंधितावर शासकीय कामात अडथळे आणल्याचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना नाशिक जिल्हा (आयटक संलग्न)चे नेते राजू देसले यांनी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील आशा कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिसप्रमुखांना मंगळवारी भेट घेऊन निवेदन देणार आहे. 

(संपादन - किशोरी वाघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: समुद्र, शॉपिंग आणि मनोरंजनाचा संगम... मुंबईला मिळाले नवे पर्यटनस्थळ; इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल आता सर्वसामान्यांसाठी खुले

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडच्या खिलाडूवृत्तीवर संशय? कर्णधार श्रेयस अय्यर संतापला, दुसऱ्या सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं?

१०० पुरुष, १५ महिलांशी शारीरिक संबंध, रात्रीच्या वेळी दारु पाजायचा अन्...; HIV पॉझिटीव्ह डिलीवरी बॉय निघाला सायको किलर

Career Numerology : 'या' मुलांकाच्या लोकांचे नशीब असते बलवत्तर! कोणतीही परीक्षा एका झटक्यात होतात पास, समाजात मिळवतात मोठं स्थान

Latest Marathi News Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरी प्रकरण दाबण्याचा कोणताही प्रयत्न करू नये - टीएमसी नेते कुणाल घोष

SCROLL FOR NEXT