Molestation
Molestation esakal
नाशिक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या नराधमाची न्यायालयीन कोठडीत रवानगी

- दीपक खैरनार

अंबासन (जि.नाशिक) : जायखेडा पोलिस ठाण्यातील हद्दीत अंधाराचा फायदा घेऊन किराणा दुकानात जाणा-या अल्पवयीन मुलीचा बळजबरीने हात पकडून विनयभंग करणा-या एका संशयित नराधमाला पोलिसांनी सिनेस्टाईलने सापळा रचून पकडण्यात यश मिळविले सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दसवेल (ता.बागलाण) येथील सुकलाल शंकर पवार या नराधमाने अंधाराचा फायदा घेत वाईट हेतूने एका अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग केला. सदर अल्पवयीन पिडीता किराणा दुकानात जात असताना संशयित आरोपीने बळजबरी करण्याचा प्रयत्न करीत असतानाच पिडीतेने आरडाओरड केला आणि संशयिताने पळ काढला घडलेला प्रकार कुटुंबियांना कथन करताच याबाबत कुटुंबियांनी जायखेडा पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.

मात्र संशयित आरोपी सुकलाल पवार फरार झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी तातडीने संशयिताचा शोध घेण्यासाठी उपनिरीक्षक नवनाथ रसाळसह, हवालदार तुकाराम जगताप रवाना केले होते. पोलीस पाटिल रविंद्र निकम यांना संशयित गावात लपूनछपून असल्याची गुप्त माहिती मिळताच उपनिरीक्षक नवनाथ रसाळसह, हवालदार तुकाराम जगताप यांनी सिनेस्टाईलने सापळा रचून संशयितांस अटक केली. संशयित आरोपी सुकलाल पवार यास पोलीसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनानुसार उपनिरीक्षक नवनाथ रसाळ करीत आहेत.

"अल्पवयीन मुलीच्या बाबतीत एकही घटना खपवून घेतली जाणार नाही. अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल."

-नवनाथ रसाळ, उपनिरीक्षक जायखेडा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT