man committed suicide with his twin children  Sakal
नाशिक

नाशिक : जुळ्या चिमुकल्यांसह खाणीत आढळला बेपत्ता पित्याचा मृतदेह

विनोद बेदरकर

ओझर/नाशिक : सोमवारपासून बेपत्ता असलेला एक मजूर व त्याचा मुलगा आणि मुलगी अशा तिघांचे मृतदेह सैय्यद पिंप्री (ता. नाशिक) येथील दगडाच्या खाणीत बेवारस स्थितीत आढळून आले. बुधवारी (ता. ८) सकाळी अकराच्या सुमारास स्थानीक नागरिकांपैकी कुणीतरी या तिघांचे मृतदेह पाण्यावर तंरगताना बघितले. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.


सैय्यद पिंप्री गावालगत दगडाच्या खाणी आहेत. या खाणींत पाण्याचे डोह असून, सध्या पावसाळ्यामुळे त्यात पाणी साचले आहे. मृत शंकर महाजन हे मोलमजुरी करत. दोन्ही जुळ्या पाल्यांना सोबत घेऊन सोमवारी (ता. ६) सायंकाळी सहाच्या सुमारास घरी काहीही न सांगता आपल्या पॅशन मोटार सायकल (एमएच १५, सीयू ६३९७)द्यारे निघून गेले होते. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ओझर- पिंप्री शिवेवरील गट नंबर १६२१मध्ये ग्राम पंचायत हद्दीतील खाणीमधील तलावात या तिघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले. याबाबत पोलीस पाटील कैलास ढिकले यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीमती आहिरराव, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती आंबोरे, कोठावदे, विक्रम कडाळे, जगदीश जाधव, कैलास पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून, स्थानिकांच्या मदतीने तिघांचे शव बाहेर काढण्यात आले. नंतर ते नाशिकला जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले.

भगतसिंगनगर (डांबरवाडी), ओझर येथील शंकर गुलाब महाजन (वय ३४) असे मृत मजूराचे नाव असून, मुलाचे नाव पृथ्वी व मुलीचे नाव प्रगती (दोघांचे वय ३ वर्षे) असे आहे. हे कुटूंब मुळचे यावल (जि. जळगाव) येथील रहिवासी आहे. या तिघांनी आत्महत्या केल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT