mandap.jpg 
नाशिक

"किमान पाचशे व्यक्तींच्या उपस्थितीला परवानगी द्या" ; तालुका मंडप असोसिएशनची मागणी

पोपट गवांदे

इगतपुरी शहर (नाशिक) : सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी मंडप, कार्यालय हॉल, लॉन्सच्या ठिकाणी किमान पाचशे व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रमांना परवानगी मिळावी, यासाठी इगतपुरी तालुका मंडप डेकोरेटर्स असोसिएशनतर्फे गुरुवारी (ता. ८) तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले. 

सात-आठ महिन्यांपासून हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ
कोरोनामुळे देशातील सर्वच व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून, मंडप डेकोरेटर्सच्या कुटुंबांवरही आर्थिक संकट ओढवले आहे. शासनाने अर्थसहाय्य मदतीचे धोरण घ्यावे, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना किमान पाचशे लोकांच्या उपस्थितीला प्राधान्य द्यावे, याची काळजी घेऊनच पुढील कार्य पार पडतील, अशा योजनेला परवानगी देऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल. सात-आठ महिन्यांपासून हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. 


अध्यक्ष प्रमोद भडांगे, उपाध्यक्ष तात्या पाटील भागडे, कोशाध्यक्ष भगवान बोंडे, सचिव गोविंद शर्मा, सल्लागार उत्तम गायकर, सदस्य काशीनाथ डावखर, विलास वालझाडे, गौतम शिरसाट, रणबीर ढकोलिया, तुळशीराम म्हसणे, गणपत भागडे, संजय वालझाडे, शाहरुख तांबोळी आदी उपस्थित होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Photo Removed Ichalkaranji : इचलकरंजी महापालिकेतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार धैर्यशिल माने यांचे छायाचित्र हटविले; शिवसेना आक्रमक

GT vs CSK Live: शुभमन गिल Out असूनही मैदानावर उभा राहिला, चेन्नईचा तिथेच कार्यक्रम झाला; गुजरातच्या कर्णधाराने मोडले अनेक विक्रम

Bandra Demolition : वांद्रेतील गरीब नगर अतिक्रमण हटाव ८५ टक्के पूर्ण; ४०० हून अधिक बांधकामे जमीनदोस्त, २३ मेपर्यंत बुलडोझर मोहीम सुरूच

11th Online Admission: अकरावी ऑनलाइन प्रवेश संकेतस्थळ ठप्प; विद्यार्थ्यांचा संताप, पहिल्या फेरीला मुदतवाढ व सुधारित वेळापत्रक जाहीर

NEET paper leak probe : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात आरोपींच्या स्वाक्षरीचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत; सीबीआयकडून चौघांची समोरासमोर चौकशी

SCROLL FOR NEXT