Jai Jai Maharashtra Majha esakal
नाशिक

Rajya Geet : शिवसेना कार्यालयाबाहेर राज्यगीत वाजविणे बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्याला राज्य सरकारने राज्यगीताचा दर्जा दिला आहे. त्याअनुषंगाने १९ फेब्रुवारीला जेथे-जेथे शिवजयंती साजरी केली जाईल, तेथे राज्यगीत वाजविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्य शासनाने काढलेल्या नवीन आदेशात ही बाब नमुद करण्यात आल्याने बाळासाहेबांच्या शिवसेना सरकारने काढलेले आदेश उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेलादेखील बंधनकारक असल्याने शिवसेना भवन समोर देखील राज्यगीत वाजविणे बंधनकारक राहणार आहे. (mandatory to play state anthem outside Shiv Sena office nashik news)

शासनामार्फत दरवर्षी १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्यात येते. तसेच पुतळे, स्मारके आहेत तेथेदेखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होते.

त्याअनुषंगाने राज्य शासनाने विशेष सूचना जारी केल्या. त्यात पुतळा परिसराची पाहणी करून रंगरंगोटी, साफसफाई व सुशोभीकरण करण्याच्या सूचना आहेत. त्याचबरोबर १ फेब्रुवारीपासून राज्यगीत जाहीर केले आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून प्रत्येक ठिकाणी राज्यगीत वाजविणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी शिवजयंतीला राज्यगीत वाजविण्यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.

जयंतीच्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या राज्यगीताचे गायन करून सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी व संबंधित कार्यालय प्रमुखांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे. त्यानंतर छोटेखानी सांस्कृतिक समारंभाचे आयोजन करावे असे आदेशात म्हटले आहे.

सार्वजनिक ठिकाणी जेथे शिवजयंती साजरी होईल तेथे राज्यगीत सादर करणे बंधनकारक असल्याने शिवसेनेलादेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश मानणे बंधनकारक राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

IND vs PAK : B@#@# मुझे आंख दिखाती है! पाकिस्तानच्या फिरकीपटूने 'डोळे वटारले', हरमनप्रीत कौरने बघा काय केले? Video Viral

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

SCROLL FOR NEXT