mangoes
mangoes esakal
नाशिक

Mango Price Fall: आवक वाढल्याने आंबा सर्वांसाठी गोड! 120 रुपये किलोवरून दर 40 ते 50 रुपयांवर

सकाळ वृत्तसेवा

Mango Price Fall : आंब्याची आवक वाढल्याने ग्रामीण भागातील आठवडे बाजारासह शहरी भागातही सर्वत्र आंबे दिसू लागले आहेत. उन्हाळ्यातील सर्व फळांची सुट्टी करून फळांचा राजा आंबा बाजारपेठेत वर्चस्व राखून आहे.

अक्षयतृतीयेपूर्वी बाजारात आंबे दाखल होतात. त्यावेळी शंभर रुपया पासून ते पाचशे रुपये किलोपर्यंत दर होते. आंब्याची गर्दी जशी जशी वाढू लागली तसतसे भाव कमी होत आहेत. बदामी आंब्याचा भाव १२० रुपये किलो वरून ४० ते ५० रुपयांवर आला आहे. (mango price fall nashik news)

रत्नागिरी, कोकण, कर्नाटक, देवगड, अहमदाबाद ,मध्य प्रदेश आदी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात विविध जिल्ह्यातील बाजारपेठेत आंबे येऊ लागले आहेत. त्यात प्रामुख्याने हापूस, लालबाग, बदामी, केशर, दशेरा ,पायरी आदी प्रकारच्या विविध जाती शहरी भागात हजेरी लावू लागले आहेत.

सध्या तरी आंब्याची साठवणूक वाहतूक मालाची प्रत यावर आंब्याचे दर अवलंबून आहेत. सध्या लग्नसराईची धूम आहे. घरोघरी या निमित्त पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली आहे. आंब्याचा कालावधी असल्याने आमरस व पुरणपोळीचा जेवणावर भर दिला जात आहे. पर्यायाने आंब्याची मागणी वाढत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हात गाड्यांवर हंगामी भाजीपाला व इतर वस्तू विकणारे विक्रेते सध्या गल्ली बोळातून खेड्यातून आंबे विक्री करताना दिसत आहेत.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी केशर आंब्याची लागवड दिसून येते. पाण्याचे नियोजन, देखरेख, औषध फवारणी,चांगली निगा यामुळे आंबे बाजारात येऊ लागले आहेत. उत्तरप्रदेशचा आंबा बाजारात दाखल झाल्याने बदामी आंबा मागे पडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT