train esakal
नाशिक

मनमाड- मुंबई गोदावरी स्पेशल ट्रेनला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिकरोड : मनमाडपासून मुंबईपर्यंत मनमाड- मुंबई गोदावरी स्पेशल ट्रेन (Godavari Special Train) प्रायोगिक तत्त्वावर ३५ दिवसांसाठी सुरु झाली. तिची मुदत १५ मेपर्यंत होती. ती आता ३० जूनपर्यंत वाढविल्याने नाशिककरांनी समाधान व्यक्त केले आहे. दीड महिन्यांच्या वाढीव कालावधीत गोदावरी स्पेशल ट्रेनच्या एकूण ९२ फेऱ्या होतील, अशी माहिती भुसावळचे डीआरएम एस. एस. केडिया यांनी ट्विटद्वारे (Tweet) नमूद केले आहे. (Manmad-Mumbai Godavari special train extended till June 30 Nashik Railway News)

रेल्वेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रेल्वे गाड्यांना जोपर्यंत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी लाभत नाही. नफ्यात येत नाहीत, तोपर्यंत त्या बंद ठेवण्याचे नवीन धोरण रेल्वेने स्वीकारल्याने गोदावरी बंद झाली आहे. पॅसेंजर, गोदावरी व अन्य ट्रेन रेल्वेने बंद केल्यामुळे जनक्षोभ वाढला आहे. गोदावरीचा तोटा या तीन महिन्याच्या काळात कमी होऊन गाडी नफ्यात चालली तर ही गाडी पूर्वीप्रमाणे कायमस्वरूपी सोडू, असे आश्वासन रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिले आहे. कोरोना आणि तोट्याच्या नावाखाली गोदावरी गाडी बंद करण्यात आली आहे. जनमताचा रेटा वाढल्याने केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांनी रेल्वे मंत्र्याकडे प्रयत्न केले. रेल्वेने गोदावरी ट्रेनला स्पेशल ट्रेन नाव देत ती ११ एप्रिल ते १५ मे अशी ३५ दिवसच चालविण्यास सुरवात केली. नेहमीची मनमाड-गोदावरी एक्स्प्रेस ही मुंबईतील एलटीटी स्थानकापर्यंत धावत होती. आता नवीन गाडी ही मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनन्सपर्यंत धावत आहे. नेहमीची गोदावरी ही पंचवटी आणि मुंबईतील लोकलप्रमाणे इंटरसिटी ट्रेनचा दर्जा असणारी आहे. नवीन गोदावरी ही स्पेशल व सुपरफास्ट ट्रेन आहे. तिचे तिकिटाचे दरही नेहमीपेक्षा जास्त आहेत.

प्रतिसाद चांगला तरच कायमस्वरूपी

स्पेशल गोदावरी प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. प्रवाशांचा प्रतिसाद चांगला लाभला तरच ती कायमस्वरूपी धावणार आहे. उन्हाळी सुटीमुळे सध्या गोदावरीला चांगला प्रतिसाद लाभत आहे. मात्र, मुंबईहून नाशिकला येताना गोदावरीला आसनगाव, खर्डीला साइड स्थानकात बाजूला करून लखनौ, नंदीग्राम, दुरांतो एक्स्प्रेस पुढे काढली जाते. मासिक पासधारक व प्रवासी वेल्फेअर असोसिएशनचे राजेश फोकणे, किरण बोरसे, संजय शिंदे, कैलास बर्वे, उज्ज्वला कोल्हे, नितीन जगताप, सुदाम शिंदे आदींनी मुंबईत रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली. गोदावरी साईडला टाकणे बंद करून गाडी वेळेत सोडण्याची मागणी केली. त्यानंतर गोदावरी नाशिकला येताना वेळेत पोहचत आहे. शिवाय तिची मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.

"गोदावरी स्पेशल मनमाडहून सकाळी ८. ४५, तर नाशिकहून ९. ४५ वाजता सुटते. मुंबईला जाताना ती वेळेत जाते. मुंबईहून निघाल्यावर नाशिक रोडला ही गाडी संध्याकाळी ७. १० पोहचते. गाडी वेळेत सोडल्यास ती कायमस्वरूपी सुरू राहील."

- राजेश फोकणे, प्रवासी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

Pune: सूपमध्ये झुरळ सापडले; पण तक्रारीकडे हॉटेल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, नंतर महिलेनं...; पुण्यातील खळबळजनक घटना

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

SCROLL FOR NEXT