Vanjarwadi: Samya found with parents esakal
नाशिक

Nashik News : ‘समा’ शोधण्यास एकत्र आले मनमाडकर; सापडल्यानंतर संपूर्ण गावातून काढली मिरवणूक

सकाळ वृत्तसेवा

मनमाड : गावात कुठेही लग्न कार्य असले की तो हमखास नाचायला असतो. त्यामुळे गावातील लोकांशी त्याचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. मात्र काही दिवसांपूर्वी तो वंजारवाडी गावातून बेपत्ता झाला आणि अख्ख्या गावाला त्याची चिंता वाटू लागली.

ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाने आवाहन केले. आपापल्या परीने त्याचा शोध सुरू केला. तो मिळून आल्याच्या आनंदात गावकऱ्यांनी त्याची गावातून वाजतगाजत जल्लोषात मिरवणूक देखील काढली. ही गोष्टी आहे मनमाड मधील १४ वर्षीय अरुण खैरनार ऊर्फ ‘समा’ याची. (Manmad People came together to find Sama After search procession was taken out from entire village Nashik News )

वंजारवाडी येथे शरद आणि बेबी खैरनार हे आपल्या कुटुंबीयांसमवेत राहतात. मोलमजुरी करून राहणारे खैरनार अगदी गरीब कुटुंब आहे. यांचा अरुण हा मुलगा आहे. अरुणला सर्व जण ‘समा’ या नावानेच हाक मारतात.

१४ वर्षाचा मात्र मतिमंद असल्याने तो जास्त बोलू शकत नाही. पण हा ‘समा’ संपूर्ण गावाचा लाडका आहे. गावात कुठेही लग्न कार्य असले की तो हमखास नाचायला असतो. त्यामुळे गावातील लोकांशी त्याचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले.

२४ जानेवारी रोजी हा समा वंजारवाडी गावातून अचानक बेपत्ता झाला. सर्वत्र शोध घेतला कुठेच मिळून आला नाही. त्यामुळे सर्व मनमाडकर हे एकत्र आले. सर्वांनी गावात, मळ्यात, शेजारच्या गावांमध्ये त्याचा शोध घेतला गेला मात्र तो मिळून आला नाही.

शेवटी मनमाड पोलिसात खबर देण्यात आली. गावातील ग्रामस्थांनी या लाडक्या सम्याचे फोटो आपापल्या स्टेट्सला ठेवले होते. सम्या घरी ये, तुझी वाट पाहत आहे. आशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्या होत्या. काहींनी तर तो हरविल्याचे पोस्टर मनमाड शहरात जागोजागी लावले होते. पण सम्याचा कुठेच पत्ता नव्हता.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

या एका मुलासाठी अख्खे गाव शोध मोहीम राबवत होते. सम्या हा मतिमंद आहे तो स्वतःचे नाव देखील सांगू शकत नसल्याने ग्रामस्थांची चिंता वाढू लागली. आठ दिवस उलटून गेले तरी देखील त्याचा शोध लागू शकला नाही.

पण ग्रामस्थांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. जो तो शोध घेत होता तेव्हाच वंजारवाडी गावात राहणारे संदीप आहिरे हे कामासाठी नाशिकला आले असताना नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर त्यांची नजर एका ठिकाणी बसलेल्या सम्यावर पडली. त्यांना आनंद आणि हसू आवरेना. त्यांनी तत्काळ त्याला जवळ घेतले. त्याची विचारपूस केली.

सम्या सापडल्याची आनंदवार्ता वंजारवाडी गावात फोन करून सांगितली.सम्या सापडला संपूर्ण गावाला माहीत झाले. संदीप आहिरे यांनी त्याला सायंकाळी गावाला घेऊन आले. समा गावात येताच गावकऱ्यांनी डीजे लावत त्याचे स्वागत केले. गावकऱ्यांनी त्याला नवीन कपडे, हारतुरे घातले.

महिलांनी औक्षण केले पूर्ण गावातून सापडलेल्या सम्याची मिरवणूक काढण्यात आली. थिरकणाऱ्या गाण्यावर सम्यासह अख्खा गावाचे पावले थिरळत होती. मतिमंद असलेला लहान सम्या मनमाड करांसाठी अभाळाएवढा झाला होता. त्याच्या तोंडातून शब्द निघत नव्हते. त्याचा आनंद त्याच्या पावलातून थिरकत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT