farm.jpg 
नाशिक

'गड्या आपलं शेतच बरं!'...म्हणत शेकडो कुटुंब शेताकडं वळले...कोरोनामुळे समजले मातीचे मोल

गोकुळ खैरनार : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : एक भाकरी खायची तर अर्धीच खाऊ...पण हे आयते दुखणे नको म्हणून लोक गावाकडे परते आहेत. त्यातच शिक्षण, नोकरीसाठी बाहेरगावी गेलेल्या लोकांपैकी कित्येक लोक आपलं गावचं शेत बरं म्हणून पुन्हा शेतात आले आहेत. एक मात्र नक्की आहे की कोरोनाने माणसाला आयुष्याची किंमत काय हे पटवून दिले आहे. अनेकांकडून तर 'शहराच्या चकाचौध पेक्षा गड्या आपला गावच बरा' अशी प्रतिक्रीया उमटत आहेत.

थेट शेतमळ्यांचा रस्ता धरला

मालेगावात कोरोना रुग्णांची संख्या सव्वाशेपर्यंत पोचली आहे. सुरवातीचे काही दिवस कोरोना रुग्ण शहराच्या मुस्लिम बहुल पूर्व भागातच आढळून आले. त्यामुळे कॅम्प, संगमेश्‍वरचा पश्‍चिम भाग निवांत होता. मात्र गेल्या आठवड्यापासून पश्‍चिम भागातही रुग्ण आढळल्याने संपूर्ण शहर कोरोनाच्या दहशतीखाली आहे. शहराच्या पश्‍चिम भागातील सोयगाव, नववसाहत, कलेक्‍टर पट्टा आदी भागात गेल्या दहा वर्षांत शेकडो नवीन वसाहती आकाराला आल्या आहेत. मोठे शेतकरी व नोकरदारांनी मुलांच्या शिक्षणासाठी सोय म्हणून या भागात घरे घेतली आहेत. काही जण व्यवसायानिमित्त शहरात आले आहेत. कोरोनाने मालेगावात थैमान मांडल्याने शहरात गेलेल्या मंडळींनी पुन्हा थेट शेतमळ्यांचा रस्ता धरला आहे. 

कोरोना विषाणूचा संसर्ग एकमेकांच्या संपर्कात आल्याने होतो. यासाठी काही दिवस शेतात राहणे सर्वांत सुरक्षित आहे. पंधरा दिवसांपासून कुटुंबीयांसह तळवाडे येथील शेतमळ्यात राहात आहे. - नीलेश काकडे, माजी नगरसेवक, मालेगाव  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मुश्रीफ सांगतील तेच, अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला तर भाजपकडून महाडिकांच्या विश्वासू शिलेदाराची निवड

अरे वाह! 'पारु' मालिकेनंतर प्रसाद जवादेला मिळाली नवी मालिका, पूर्वा कौशिकसोबत नवी जोडी, प्रोमो Viral

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

SCROLL FOR NEXT