Maratha community will celebrate Black Diwali this year nashik news esakal
नाशिक

Maratha Reservation: मराठा बांधव यंदा काळी दिवाळी साजरी करणार; बैठकीत निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारवर दिवसेंदिवस दबाव वाढत असताना नाशिकमधील सकल मराठा समाजाने यंदा काळी दिवाळी साजरी करण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. राजकीय कार्यक्रमांवरही बंदी घातली आहे.

नाशिक बंदबाबत तूर्त कुठलाही विचार नसल्याने शांततेच्या मार्गाने मराठा समाजाचे उपोषण सुरू ठेवण्याचा विचार सर्वपक्षीय नेत्यांनी मांडला. (Maratha community will celebrate Black Diwali this year nashik news)

सीबीएस येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ सकल मराठा समाजाची सभा बुधवारी (ता.१) पार पडली. या वेळी दत्ता गायकवाड, दिनकर पाटील, करण गायकर, विलास शिंदे, बंटी भागवत, शिवाजी सहाणे, भागवत आरोटे, सुधाकर बडगुजर, प्रताप मेहेरोलिया, अनिल ढिकले, प्रकाश लोंढे, सुरेश मारू, ॲड. तुषार जाधव, ॲड. स्वप्ना राऊत, वत्सला खैरे, पूजा धुमाळ, पूनम पाटील यांनी आपली भूमिका मांडली.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील जिवावर उदार होऊन उपोषण करत आहेत. अशा परिस्थितीत नाशिक शहर व जिल्ह्यात एकाही घरात दिवाळी साजरा होणार नाही. युवकांनी, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, कुठल्याही हिंसक आंदोलनास सकल मराठा समाजाचे समर्थन असणार नाही, अशा स्वरूपाचे निर्णय सर्वानुमते घेण्यात आले. मराठा समाजावरील दावे लढविण्यासाठी २५ वकील सर्वतोपरी मदत करतील, असा विश्वास ॲड. महेश आहेर यांनी व्यक्त केला.

मराठा समाजाच्या बैठकीस विविध संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला. या वेळी उपोषणकर्ते नाना बच्छाव, चंद्रकांत बनकर, राम खुर्दळ, प्रफुल्ल वाघ, नितीन रोटे पाटील, योगेश कापसे, सचिन पवार, ॲड. तुषार जाधव, श्रीराम निकम, महेंद्र बेहेरे, विकी गायधनी, गणेश पाटील, चेतन शेलार, प्रकाश धोंगडे आदी उपस्थित होते. दरम्यान, मराठा आरक्षणाच्‍या मागणीसाठी ठिकठिकाणी उपोषण, मशाल रॅली निघत असताना निफाड तालुक्‍यातील चांदोरी येथे गुरुवारी (ता.२) सकाळी ९.३० वाजता पंचक्रोशीतील ४५ गावांचे एकाच ठिकाणी आंदोलन होत आहे.

सभेतील महत्त्वपूर्ण ठराव

-एकाही घरात दिवाळीचा दिवा पेटणार नाही

-सरकारचा निषेध म्हणून काळी दिवाळी

-सकल मराठा समाजाचे बेमुदत उपोषण सुरूच राहणार

-सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी कुठलाही राजकीय कार्यक्रम घ्यायचा नाही

-मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेनुरुप आंदोलन कायम

-आमदार, खासदारांनी इनकॅमेरा बेमुदत उपोषण सुरू करावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT