Officers and staff while inspecting records at East Divisional Office esakal
नाशिक

Maratha Reservation: पूर्व विभागात 1 हजार 807 कुणबी, 1 मराठा कुणबी नोंद! 3 दिवसात 1 लाखाहून अधिक नोंदींची तपासणी

- युनूस शेख

जुने नाशिक : मराठा आरक्षण संदर्भात सरकारने कुणबी नोंदी तपासण्याचे आदेश पारित केले आहे. महापालिका पूर्व विभागात पुरातन जन्म-मृत्यू नोंदणी आहे.

त्यानिमित्ताने विभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात अधिकारी कर्मचाऱ्यांकडून गेल्या तीन दिवसात १ लाख ३७ हजार ९८४ नोंदींची तपासणी केली आहे.

त्यात ७८ हजार ५१८ जन्म तर ५९ हजार ४६६ मृत्यू नोंदीचा समावेश आहे. या सर्व नोंदी १९६७ पूर्वीच्या असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. (Maratha Reservation 1 thousand 807 Kunbis in Eastern Division 1 Maratha Kunbi registered Screening of more than 1 lakh entries in 3 days nashik)

मराठा आरक्षणसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी २ जानेवारीपर्यंत राज्य सरकारला मुदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा अशा तीन प्रकारच्या नोंदी शोधण्याचे आदेशित केले आहे.

जन्म मृत्यू नोंदणी असलेल्या शासकीय विभागात गेल्या तीन ते चार दिवसापासून नोंदणी शोधण्याचे काम सुरू आहे. महापालिका पूर्व विभागात अशाच प्रकारच्या १८९७ पासून मोडी लिपीतील नोंदी आहे.

१९३३ पर्यंत मोडी लिपीतील नोंदी असून १९३४ पासून ते १९६८ पर्यंत देवनागरी अर्थात मराठी लिपीतील संपूर्ण नोंदी आहे.

त्यामुळे विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक चंदन घुगे तसेच श्री. कळमकर यांच्यासह जन्म मृत्यू विभागातील अन्य अधिकारी कर्मचारी गेल्या तीन दिवसापासून कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा अशा तिन्ही प्रकारच्या नोंदी शोधण्यात व्यस्त आहे.

गेल्या तीन दिवसात त्यांच्याकडून १ लाख ३७ हजार ९८४ नोंदींची तपासणी केली आहे. त्यात ७८ हजार ५१८ जन्म तर ५९ हजार ४६६ मृत्यू नोंदी आढळून आल्या आहे.

या सर्व नोंदी १९६७ पूर्वीच्या असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. देवनागरी नोंदीची तपासणी पूर्ण झाली असून मोडी लिपीतील नोंदीची अजूनही तपासणी सुरू असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. जीर्ण रजिस्टर झाल्याने अडचण येत आहे.

अशा आढळल्या नोंदी

तपासणी करण्यात आलेल्या नोंदीत १ हजार ८०७ कुणबी तर १ मराठा कुणबी नोंद आढळून आली आहे. आतापर्यंत झालेल्या तपासणीत कुणबी मराठा एकही नोंद सापडलेली नाही.

या नोंदणीत देवनागरीतील केवळ ७५ नोंदी असून उर्वरित १ लाख ३७ हजार ९०९ नोंदी मोडी लिपीतील आहे.

जीर्ण रजिस्टरची अडचण

मोडी लिपीतील नोंद असलेले रजिस्टर अतिशय जुने झाले आहे. त्यांचे पाणी जीर्ण होऊन गळून पडलेली आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नोंदी तपासण्यात अडचण येत आहे.

मोडी लिपिक वाचकाची नियुक्ती

राज्य सरकारने मागितलेल्या मागणीचे रेकॉर्ड मोडी लिपीतील आहे. महापालिकेकडे गेल्या अनेक वर्षापासून मोडी लिपिक वाचक नसल्याने मानधनावर अन्य शासकीय विभागातील मोडी लिपिक वाचकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांच्या माध्यमातून मोडी लिपी नोंदणीची तपासणी करून त्याचे मराठीत भाषांतर करून नोंदी तपासल्या जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

SCROLL FOR NEXT