Maratha Reservation Gram Panchayat Education Department found 8 thousand Kunbi records nashik news Sakal
नाशिक

Maratha Reservation: ग्रामपंचायत, शिक्षण विभागाला सापडल्या 8 हजार कुणबी नोंदी

सकाळ वृत्तसेवा

Maratha Reservation : मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यातही अशा प्रकारचीच मोहीम राबविण्यास सुरवात झाली आहे.

यात जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत आणि शिक्षण विभागातील शाळांकडूनही कुणबी नोंदी शोधमोहीम सुरू आहे. दोन दिवसांत दोन्ही भागांत झालेल्या तपासणीत १९४८ पूर्वीच्या व १९४८ ते १९६७ या कालावधीतील एकूण आठ हजार नोंदी सापडल्या आहेत. (Maratha Reservation Gram Panchayat Education Department found 8 thousand Kunbi records nashik news)

अंतरवली सराटी येथील मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणानंतर कुणबी जातीचे पुरावे तपासणीसाठी राज्यभर ‘मिशन मोड’वर प्रक्रिया राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या आदेशानंतर नाशिकमध्ये जिल्हा आणि तालुकापातळीवर समिती स्थापन करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठीचा विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हा आणि तालुका पातळीवर यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्यानंतर समितीच्या कामकाजाला सुरवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत व प्राथमिक शिक्षण विभागानेही यात सहभागी व्हावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या.

याबाबत श्रीमती मित्तल यांनी ग्रामपंचायतीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, तालुका गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, ग्रामसेवक यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. यात शाळा व ग्रामपंचायतींतून नोंदी शोधण्यात याव्यात, असे निर्देश दिले.

याबाबतचा अहवाल तत्काळ सायंकाळी पाठविण्यात यावा, अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार अहवाल प्राप्त होत आहे. दोन दिवसांच्या १३ तालुक्यांतून प्राप्त झालेल्या अहवालानुसार सात हजार ७१४ नोंदी सापडल्या आहेत. निफाड व इगतपुरीचा अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त झालेला नव्हता.

तालुकानिहाय प्राप्त झालेल्या नोंदी

मालेगाव (दोन हजार ४२४), सिन्नर (४९४), देवळा (८९), चांदवड (७१), त्र्यंबकेश्वर (५०), दिंडोरी (दोन हजार ४८३), सटाणा (५८०), येवला (एक हजार ३७), पेठ (०), सुरगाणा (०), नांदगाव (४०), नाशिक (४४६), कळवण (०).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT