sahitya sammelan esakal
नाशिक

साहित्य संमेलन 19 नोव्हेंबरपासून घेणे शक्य - ठाले-पाटील

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : नाशिक येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान घेणे शक्य असल्याची माहिती अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले- पाटील यांनी शुक्रवारी (ता. ८) ‘सकाळ’शी बोलताना दिली. यामुळे नाशिककर साहित्यप्रेमींना संमेलनाची भरगच्च मेजवानी मिळणार आहे.

कौतिकराव ठाले- पाटील यांची माहिती, शासनाला तारखा कळविल्या

कोरोनामुळे या संमेलनाची शक्यता धूसर झाली होती. संसर्ग आटोक्यात आल्यानंतर संमेलन होण्यातील अडथळे दूर झाले. यापूर्वीच हे संमेलन घेण्याचा मान यंदा नाशिककरांना मिळाला आहे. त्यामुळे नाशिकचे लोकहितवादी मंडळ, स्वागत मंडळ आणि साहित्य महामंडळ हे संमेलन व्हावे म्हणून प्रयत्नशील होते. या पार्श्ववभूमीवर ठाले - पाटील ‘सकाऴ' शी बोलताना म्हणाले, ‘साहित्य महामंडळ आणि नाशिकचे स्वागत मंडळ यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीतील चर्चेदरम्यान स्वागत मंडळाने नोव्हेंबरमधील १९, २०, आणि २१ तारखाबाबत तोंडी आणि लेखी माहिती साहित्य महामंडळाला दिली होती. या तारखांवर आम्ही सकारत्मक आहोत. या तारखा शासनाला माहिती म्हणून पाठविल्या आहेत’.

नाशिकमध्ये समितीची चर्चा

स्थगित झालेल्या संमेलनाबाबत गुरुवारी (ता.७) पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी साहित्य संमेलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यात यापूर्वीच्या निर्णयाप्रमाणे १९ ते २१ नोव्हेंबरला की जानेवारीमध्ये संमेलन घ्यायचे असे सूत्र राहिले. जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, विश्‍वास ठाकूर, सुभाष पाटील आदी चर्चेसाठी उपस्थित होते. विधीमंडळाचे अधिवेशन डिसेंबरमध्ये अपेक्षित असल्याने संमेलनासाठी डिसेंबर हा महिना उपयुक्त ठरणार नाही असेही सूचित करण्यात आले होते. याबाबत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांची भेट घेतली जाणार होती. त्यामुळे आता ठाले पाटील यांनी वरील तारखांबाबत आपण सकारात्मक आहोत असे म्हटल्याने संमेलन दिवाळीनंतर होणार हे निश्‍चित मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : थंडीचा कडाका झाला कमी, राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी; तुमच्या भागात आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

हिवाळ्यात पाठीचा कणा सुरक्षित ठेवण्याचे मार्ग

Satara Crime: ज्यादा परताव्याचा आमिष नडला! 'साताऱ्यात युवकाची १६ लाखांची फसवणूक'; फाेन उचलन बंद, नेमकं काय घडलं?

खेलो इंडिया बीच कबड्डीत महाराष्ट्राची धडाकेबाज सलामी, दीव-दमण अन् दिल्ली संघांचा उडवला धुव्वा

Panchang 6 January 2026: आजच्या दिवशी गणेश सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT