market price of onion continues to fall nashik news  
नाशिक

Nashik Onion Rate: कांद्याच्या बाजारभावात घसरण सुरूच; कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion Rate: ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’मार्फत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून पंचवीस रुपये किलो दराने दोन लाख टन कांद्याचे मुंबई, दिल्लीसह उत्तरेकडील मोठ्या शहरांमध्ये वाटप सुरू झाल्याने त्याचा कांदा व्यापाऱ्यांनी धसका घेतला असून, गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या दरात रोज घसरण होत कांद्याचे सरासरी दर प्रतिक्विंटल ३७०० रुपयांच्या आत आल्याने आठ दिवसांत एक हजार २५० रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. (market price of onion continues to fall nashik news)

सणासुदीच्या तोंडावर गेल्या आठवड्यात २७ ऑक्टोबरला उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त पाच हजार ८२० रुपये, सरासरी चार हजार ९०० रुपये इतका दर प्रतिक्विंटलला मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असताना राजस्थान, मध्य प्रदेशसह पाच राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्राने कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी नाफेड, एनसीसीएफमार्फत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून दोन लाख टन कांदा पंचवीस रुपये किलोप्रमाणे किरकोळ बाजारात वाटप करण्याचा निर्णय घेतला. तसेच निर्यात होणाऱ्या कांद्याच्या निर्यातमूल्य दर ८०० अमेरिकन डॉलर केल्याने त्याचा परिणाम घाऊक बाजारात कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून विक्री होणाऱ्या कांद्याच्या दरावर परिणाम झाला.

आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ असलेल्या लासलगावसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात रोज घसरण होत असून, शुक्रवारी (ता. ३) लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची ७७७ वाहनांतून दहा हजार क्विंटल आवक झाली. त्याला जास्तीत जास्त चार हजार २४६ रुपये, कमीत कमी एक हजार ४००, तर सरासरी तीन हजार ६५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. लाल कांद्याची आठ वाहनांतून २०० क्विंटल आवक झाली. त्याला जास्तीत जास्त तीन हजार ९०१ रुपये, कमीत कमी एक हजार १५१ रुपये, तर सरासरी तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

चुकीच्या धोरणाचा कांदा भावावर परिणाम

केंद्र सरकार कांद्याबाबत चुकीचे धोरण राबवत असल्याने त्याचा परिणाम थेट कांदा बाजारभावावर होत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला समोर जावे लागत असल्याने केंद्र सरकारने आपल्या निर्णयाचा शेतकरी हितासाठी फेरविचार करावा, अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT