Nashik Onion Price Sakal
नाशिक

नाशिक : उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात वाढ

भाऊसाहेब गोसावी

चांदवड (जि. नाशिक) : गेल्या काही दिवसांपासून संततधार, तर कधी मुसळधार पावसामुळे दक्षिणेकडील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमधून नवीन लाल कांदा उशिराने बाजारात दाखल होणार आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा खराब होत असल्याने मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाली आहे. यामुळे कांद्याच्या बाजारभावात गत सप्ताहाच्या तुलनेत एक हजार रुपयांची वाढ झालेली आहे.

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर सोमवार (ता. ४) कांदा शेतीमालाची तीन हजार क्विंटल आवक होऊन बाजारभाव कमीत कमी एक हजार ५००, जास्तीत जास्त तीन हजार ७७१ व सरासरी तीन हजार ३५० रुपये प्रतिक्विंटल राहिले.

मागील काही महिन्यांपासून कांदा बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झालेली होती. परंतु गत सप्ताहापासून कांद्याचे बाजारभावात वाढ होत आहे. बाजारभावामध्ये वाढ दिसत असली तरी शेतकऱ्यांनी मार्च आणि एप्रिल महिन्यात चाळीमध्ये कांदा साठवून ठेवलेल्या कांद्यावर बदलत्या वातावरणामुळे परिणाम होऊन त्याच्या वजनात आणि प्रतवारीमध्ये कमालीची घट येत असल्याने वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होताना दिसत नाही. देशांतर्गत व परदेशात महाराष्ट्रातील कांद्यास मागणी वाढल्याने कांदा बाजारभावात वाढ झालेली आहे. बाजारभावात सुधारणा झाली असली तरी चांदवड बाजार समितीच्या आवारावरील शेतीमालाची आवक स्थिर आहे.

शेतकरी बांधवांनी आपला शेतीमाल प्रतवारी करून मोठ्या प्रमाणात चांदवड बाजार समितीत विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर, सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे आणि सर्व संचालक मंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gokul Election 2026 : आमदार, माजी आमदारांसह बडे नेते 'गोकुळ'च्या रिंगणात; एकाच दिवशी 133 इच्छुकांचे 205 उमेदवारी अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस

Pune Road Project: कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम रखडण्याची शक्यता; भूसंपादनासाठी आणखी ३ ते ४ महिन्यांचा कालावधी

Maharashtra Drought: शरद पवार करणार दुष्काळाची पाहणी; राज्यात २८ सप्टेंबरपासून दौरा; शेतकऱ्यांशी थेट संवाद

Bangladesh MP Arrested : ७५ वर्षीय खासदाराच्या १९ वर्षीय पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; घटनास्थळी चिठ्ठी सापडली अन्, खासदाराला पोलिसांकडून अटक

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT