To demand Maratha reservation and to support Manoj Jarange Patil, a torch march was taken out from the Chhatrapati Shivaji Maharaj statue at CBS on Monday. esakal
नाशिक

Maratha Reservation Protest: जिल्ह्यात साखळी उपोषण सुरू, गावबंदी कडक; सकल मराठा समाजातर्फे मशाल रॅली

सकाळ वृत्तसेवा

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी लढत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नाशिकमधील सकल मराठा समाजातर्फे शहरात मशाल रॅली काढण्यात आली. दरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू असून यात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होत आहेत.

जिल्ह्यात साखळी उपोषणे सुरू असून नेत्यांना कडक गावबंदी करण्यात आली आहे. शासकीय कार्यक्रमांवरही बहिष्कार घालण्यात आले आहेत. (mashal rally by Maratha community for reservation nashik news)

ठिकठिकाणी कॅंडलमार्चचे आयोजन करण्यात येत आहे. एकुणात आंदोलनाची धग वाढतच आहे. मात्र आंदोलने शांततेत सुरू असून कुठेही अनुचित घटना घडलेली नाही.

सीबीएस येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याशेजारी सकल मराठा समाजाचे बेमुदत उपोषण सुरू आहे. नाना बच्छाव हे बेमुदत उपोषण करत आहेत. उपोषण स्थळापासून सोमवारी (ता.३०) सायंकाळी सहा वाजता बाल वारकरी, मराठा बंधू भगिनींच्या उपस्थितीत मशाल रॅली काढण्यात आली. सीबीएस सिग्नल पासून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजीरोड, मेनरोड मार्गे ही मशाल रॅली टाळ मृदुंगच्या गजरात निघाली.

तत्पूर्वी, त्र्यंबकेश्वर येथील आधारतिर्थ आश्रमातील मुलांनी ‘रडायचं नाही आता लढायचं’ हे पथनाट्य सादर केले. मनोज जरांचे पाटील यांना दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी आई तुळजाभवानीकडे जोगवा मागण्यात आला.

यावेळी नाना बच्छाव, राम खुर्दळ, चंद्रकांत बच्छाव, नितीन डांगे पाटील, शरद लभडे सचिन पाटील, योगेश कापसे, पवन पवार, राजेंद्र घडवजे, विकी गायधनी, स्वाती कदम, रोहिणी उखाडे, ॲड. शीतल भोसले, विजय चव्हाण, बापू चव्हाण, राज भामरे, सुनील निरगुडे,नितीन रोटे पाटील,राजू देसले, शिवाजी शेलार, गजानन लकडे,चेतन शेलार,सचिन कदम,संजय साबळे आदी समाजबांधव उपस्थित होते.

"जे लोकप्रतिनिधी सध्या राजीनामा देण्याचे नाटक करत आहेत, त्या लोकप्रतिनिधींना राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी ज्यांना घटनेने राजीनामा मंजूर करायचा अधिकार दिला आहे त्यांच्याकडे नेवून द्यावा. आपल्या पक्ष प्रमुखाकडे राजीनामा मंजूर होणार नाही आणि त्यांना मंजूर करण्याचा ही अधिकार नाही. त्यांच्याकडे देऊच नये. हे सर्व नाटक आहे, जनता या वेळेस त्यांना माफ करणार नाही." - अशोक सातभाई, माजी नगरसेवक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nursing Student Case : आई-वडील घरी येताच समोर आला धक्कादायक प्रकार; 20 वर्षीय पायलचा दुर्दैवी शेवट, 'नर्सिंग'चे घेत होती शिक्षण

तेजश्रीला लागलं नव्या ट्रेंडचं वेड, सोशल मीडियावर 3D फोटोची भलतीच क्रेझ, फोटो व्हायरल

Solapur Crime : नर्तकी असलेल्या प्रेयसीने भेट न दिल्याने माजी उपसरपंचाने गोळी झाडून संपविले जीवन; नर्तकीविरुद्ध गुन्हा दाखल

Fake Job Scam : बोगस नोकरीची मुलाखत चक्क मंत्रालयात, नागपुरातील तरुणाकडून लाखो रुपये उकळले...धक्कादायक प्रकरण समोर!

Navid Mushrif : नविद मुश्रीफांना शौमिका महाडिकांनी म्हटलं पळपुटे; बहीण-भावाच्या नात्यात दुरावा?

SCROLL FOR NEXT