massive fire broke out at Peanut oil mill in Satna two workers injured
massive fire broke out at Peanut oil mill in Satna two workers injured  
नाशिक

नाशिक : सटाण्यात शेंगदाणा ऑईल मिलला भीषण आग, दोन कर्मचारी जखमी

रोशन खैरनार

सटाणा (जि. नाशिक) : सटाणा – नाशिक रस्त्यावर शहरापासून जवळच असलेल्या कंधाणे फाट्यावरील स्वदेशी शेंगदाणा ऑइल मिलला आज अचानक आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सटाणा नगर परिषद व मालेगाव महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून आगीमुळे दोन कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून घटनास्थळी सटाणा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पालिकेचे अधिकारी- कर्मचारी आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

शहरापासून अवघ्या काही अंतरावर नाशिक रस्त्यावरील कंधाणे फाट्यावर भांगडिया कुटुंबीयांची स्वदेशी शेंगदाणा ऑइल मिल आहे. या ऑइल मिलमध्ये आज सकाळी नेहमीप्रमाणे कर्मचारी काम करीत होते. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास आतील गोडाऊनच्या ठिकाणी आग लागून धूर येत असल्याचे कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे कर्मचार्‍यांनी तात्काळ मिलच्या बाहेर पळ काढला. परंतु क्षणार्धात वाढलेल्या आगीमुळे दोन कर्मचारी जखमी झाल्याचे समजते. या मिलच्या अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात भुईमूग शेंगांचा साठा असून याच ठिकाणी ही आग लागली. साहजिकच वाळलेल्या शेंगा, टरफले आणि भुईमूग मधील तेल यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य पसरले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी मिलकडे धाव घेतली. मात्र मोठ्या प्रमाणातील धूरामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच सटाणा पालिकेचा अग्निशमन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. पाठोपाठ पालिकेचे तीन टँकरही घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करीत होते. दुपारपर्यंत अग्निशमन बंबाने पाच ते सहा फेर्‍यांद्वारे पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष आगीचे लोळ दिसत असले तरी या ठिकाणी भुईमूगच्या शेंगांना मोठ्या प्रमाणात आग लागल्याने धुळीचे लोळ बाहेर दूरपर्यंत येत आहेत. दुपारी दोनच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मालेगाव महानगर पालिकेचा अग्निशमन बंबही पोहोचला. आग पसरू नये म्हणून गोडाऊनचा पत्रा बाहेरून कापून जेसीबीच्या सहाय्याने आतील शेंगांचे पोते व टरफले बाहेर काढले जात असून त्या ठिकाणी पाण्याचे फवारे मारून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

घटनास्थळी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुभाष अनमूलवार, पालिकेचे मुख्याधिकारी नितिन बागूल, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, उपनिरीक्षक राहुल गवई आदींसह पालिकेचे आस्थापना प्रमुख व पोलीस कर्मचारी उपस्थित राहून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करीत आहेत. भांगडिया कुटुंबीय, नातलग तसेच शहर व परिसरातील ग्रामस्थांकडून देखील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात होते. सध्या तरी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळू शकलेले नसून सटाणा व मालेगाव येथील अग्निशमन बंबांकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT