tatya lahane 123.jpg
tatya lahane 123.jpg 
नाशिक

नाशिकमध्ये लवकरच सुरू होणार वैद्यकीय महाविद्यालये; डॉ. तात्याराव लहानेंची माहिती

महेंद्र महाजन

नाशिक : नंदुरबारमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून शिक्षणाला सुरवात झाली. पुढील वर्षी अलिबाग, सिंधुदुर्ग, सातारामधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल. दोन वर्षांनंतर नाशिकमधील पदव्युत्तर पदवी आणि पदवीसह अमरावती, परभणी, उस्मानाबादमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘सकाळ’ला दिली. 

अलिबागसह सिंधुदुर्ग अन्‌ सातारामधील पुढील वर्षी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय 
राज्याचे अन्न-औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ‘ट्विट’करून बुलढाणा येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, डॉ. लहाने म्हणाले, की अलिबाग, सिंधुदुर्ग, सातारामधील वैद्यकीय महाविद्यालयासाठी पहिले आणि दुसऱ्या तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ही महाविद्यालये पुढील वर्षी सुरू होतील. दोन वर्षांनंतर सुरू होण्याच्या टप्प्यातील राज्यातील इतर महाविद्यालये पुढील वर्षी सुरू करण्यासंबंधीचा आग्रह पुढे आलेला आहे. मात्र, त्यासाठी तपासणीची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. 

शंभर कोटींची तरतूद करण्याची शक्यता
नाशिक महापालिकेच्या नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालयात वैद्यकीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्राथमिक आराखडा सादर करण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. हा प्रस्ताव सरकारला पाठवून अंदाजपत्रकात शंभर कोटींची तरतूद करण्याची शक्यता दिसते आहे. अगदी सुरवातीच्या काळात महापालिका रुग्णालय अथवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या माध्यमातून सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. पण त्यासाठीची क्षमता महापालिकेच्या रुग्णालयांची नसल्याने पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचा विषय पुढे आला आहे. महापालिकेने रुग्णालयाच्या तपासणीसाठी शुल्क दिले आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, सर्जिकल, अस्थीरोग, कान-नाक-घसातज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, रेडिओलॉजी, त्वचारोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ असे ५६ विशेषतज्ज्ञ नागरी आरोग्यसेवेसाठी उपलब्ध होऊ शकतील. 

आरोग्य विद्यापीठाचा प्रस्ताव 
नाशिक महापालिकेतर्फे वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले असताना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे शहरात सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रस्ताव देण्याचे ठरवले. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यासंबंधीच्या बैठकी घेतल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यातून नाशिकची खऱ्या अर्थाने ‘एज्युकेशन हब’च्या दिशेने वाटचाल सुरू होण्यास मदत होणार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT