tribal development department.jpg
tribal development department.jpg 
नाशिक

तुम्ही भरलेला 'मेगा भरती'चा फॅार्म फेक तर नाही ना?...कारण

सकाळवृत्तसेवा

नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तालयाच्या नावाने बनावट संकेतस्थळा वर मेगा नोकरभरतीची जाहिरात करीत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 'आदिवासी'चे बनावट संकेतस्थळ तयार करून अज्ञात संशयितांनी त्याद्वारे 3 हजार 199 विविध पदांच्या मेगा नोकर भरती जाहीर करीत, ऑनलाईन शुल्काची मागणी केलेली होती. त्याद्वारे बेरोजगारांची फसव णूक होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, याप्रकरणी सायबर पोलिसांचे विशेष पथके तयार करून ती रवाना करण्यात आली आहेत. 

या बनावट संकेतस्थळावर 3 हजार 199 जागांसाठीची मेगा नोकर भरती

आदिवासी विकास आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त अविनाश अशोक चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिवा सी विकास आयुक्तालयाच्या mahatribal.webs.com या नावाचे बनावट संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. हे बनावट संकेतस्थळ हुबेहूब आदिवासी विभागाच्या संकेत स्थळासारखेच बनविण्यात आलेले आहे. या बनावट संकेतस्थळावर 3 हजार 199 जागांसाठीची मेगा नोकर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये सिव्हिल इंजिनिअर, इलेक्‍ट्रिक इंजिनीअर, सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट, सुपरवायझर, लॅबोरे टरी असिस्टंट, शिपाई अशा पदांसाठीची मेगा नोकर भरतीची जाहिरात बनावट देण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असून अर्जा साठी खुल्या प्रवर्गाला 500 रुपये आणि इतरांसाठी 350 रुपये शुल्क आकारण्यात आले आहेत. हे शुल्क ऑनलाइन मागविण्यात आलेले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव याअंतर्गत भरती असून मुंबईसाठी 1 हजार 31, नाशिक 724, पुणे 866, जळगाव 578 जागा भरणार असल्याची mahatribal.webs.com या बनावट संकेतस्थळावर माहिती देण्या आली आहे. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सायबरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवराज बोरसे हे करीत आहेत. 

पथके रवाना 

तांत्रिक माहितीच्या आधारे महत्त्वाची माहिती सायबर पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यानुसार विशेष पथके तयार करून ती रवाना करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या संकेतस्थळासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आणि संशयितापर्यंत सायबर पोलिस पोहोचतील अशी शक्‍यता आहे. 

आदिवासी विभागाच्या या बनावट मेगा नोकरी भरतीतून हजारो बेरोजगार तरुणांची फसवणूक होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बेरोजगारांनी आदिवासी विभागाच्या या संकेतस्थळावरील माहितीनुसार शुल्क भरू नये. तसेच, कोणत्याही शासकीय नोकर भरतीसंदर्भात शहानिशा करणे आवश्‍यक आहे. यामुळे आर्थिक फसवणूक टाळता येऊ शकते. - देवराज बोरसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT