mental health related helpline service started in nashik marathi news
mental health related helpline service started in nashik marathi news 
नाशिक

फोन करून करा मन मोकळं; मनाच्या 'त्या' प्रश्नांना नाशिकच्या तरुणांचा रामबाण उपाय, एकदा वाचाच

प्रशांत कोतकर

नाशिक : ‘मन चंगा, तो कठौती में गंगा’ आजवर अनेकवेळा गमतीत आपण हे एकमेकांना आणि क्वचितप्रसंगी स्वतःलादेखील म्हणत आलो आहोत. पण, गेल्या काही दिवसांत आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहता, या मनाची ‘स्थिती' काय फारशी ठीक दिसत नाही; पण मग करायचं काय? सर्वत्र मोफत उपलब्ध असलेले डझनभर मोटिव्हेशनल व्हिडिओज बघायचे का? की स्वतःचा तिरस्कार करत, कुंथत कुंथत आयुष्याची गाडी पुढे ढकलायची? नक्की बोलायचं कोणाशी आणि करायचं तरी का? या सगळ्या प्रश्नांवर रामबाण उपाय काढलाय नाशिकच्या ‘मनोयुग सायकॉलॉजी स्टुडियो’ने.

तरुणांसोबत काम करणाऱ्या या संस्थेचे संस्थापक तथा मानसोपचारतज्ज्ञ चिन्मय पळसोदकर यांनी ‘तासीर’ नावाची नवीन संकल्पना नाशिक शहर व परिसरात दोन आठवड्यांपासून राबवायला घेतली आहे. टीमचे मेंबर मल्हार देशमुख यांनी सांगितले, की या उपक्रमांतर्गत मनाचं विज्ञान समजून घेत मनाचा विकास करण्यासाठी सायकॉलॉजी विषयात शिक्षण घेणारे, शिक्षण घेतलेले, तसेच या विषयाची गोडी असलेले आम्ही काही तरुण एकत्र आलो आहोत. ‘मनाची हेल्पलाइन’ व ‘इमोशनल जिम’ या दोन अत्यंत नावीन्यपूर्ण कल्पना आम्ही मानसोपचारतज्ज्ञ चिन्मय पळसोदकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणल्या आहेत. 

काय आहेत नावीन्यपूर्ण कल्पना 
‘मनाची हेल्पलाइन’ या हेल्पलाइनवर फोन करून तुम्ही तुमचं मन मोकळं करू शकता. ही हेल्पलाइन हाताळणाऱ्या मंडळींना ‘कसं ऐकायचं’ याचं प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे. त्यामुळे इथे मोकळं होणंदेखील वेगळं आणि विशेष असणार आहे. ‘इमोशनल जिम’मध्ये शारीरिक स्वास्थ्यासाठी आपण व्यायाम करतो; पण मग मानसिक स्वास्थ्याचं काय? रोज मनाचे काही व्यायाम आपण केले, तर मानसिक बदलांना सक्षमपणे सांभाळता येऊ शकतं. इमोशनल जिममध्ये काही अत्यंत कल्पक ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून मानसिक आरोग्य कसं राखायचं, याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. वरील दोन्ही गोष्टींचा फायदा करून घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे देशमुख यांनी सांगितले. 


...अशी आहे टीम 
मानसोपचारतज्ज्ञ चिन्मय पळसोदकर, डिंपल किशनानी, सामय्याका अंभोरे, गौरांगी जंगम, संबोधी अंभोरे, रेमन्ड इराणी, समृद्धी पोले, तन्मय पाठक, प्राचीत भावे, आकांक्षा चंदात्रे, मल्हार देशमुख, ज्ञानेश्‍वरी वेलणकर, आकांक्षा बिरारी. 
हेल्पलाइन क्रमांक : ८६६८९४०९८५ 
वेळ : सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत. 

संपादन : प्रशांत कोतकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT