Saraf Bazar Nashik esakal
नाशिक

Nashik : गोदावरीच्या पुराने सराफ बाजार झाला रिकामा

युनूस शेख


जुने नाशिक : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने गोदावरीला पूर आला आहे. यामुळे सराफ बाजारात पाणी शिरण्याची शक्यता व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात आली. मोठे नुकसान होण्यापूर्वीच सराफ व्यावसायिक आणि भांडी व्यवसायिक यांनी सराफ बाजारातील आपल्या दुकानांमधील सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा आणि भांडी, कपडे अशा विविध प्रकारचा माल अन्य ठिकाणी स्थलांतरित करत आपली दुकाने रिकामी केली आहे.

इतिहासाची पुनरावृत्ती नको म्हणून हा निर्णय

गोदावरी काठावरच सराफ बाजार ही बाजारपेठ वसलेली आहे. त्यामुळे पुराचे पाणी सराफ बाजारात शिरण्याचे प्रकार घडत असतात. तीन ते चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे गोदावरीस मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने संपूर्ण सराफ बाजारात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले होते. सर्व दुकाने पाण्यात बुडाल्याने येथील व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पुन्हा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी व्यवसायिकांनी काळजी घेत नुकसान होण्यापूर्वीच बुधवारी (ता.२९) नदीस आलेल्या पुरानंतर सकाळपासूनच दुकाने रिकामे करण्यास सुरुवात केली. दुपारपर्यंत संपूर्ण दुकाने रिकामे करून घेतले. सराफ व्यावसायिकांनी दुकानातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह अन्य विविध प्रकारचे मौल्यवान दागिने तसेच भांडी व कपडे व्यावसायिकांनी तांबे, पितळ, स्टील भांडी आणि कपडे असा विविध प्रकारचा माल घरी तसेच त्यांच्या शहरातील अन्य दुकानांमध्ये स्थलांतरित केला.

लॉकडाऊननंतर आता पुन्हा नुकसान झेपावणार नाही

दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. शिवाय बुधवारी पूर देखील आला. टप्प्याटप्प्याने आणखी धरणातून पाणी विसर्ग करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाल्या होत्या. अशा वेळेस पाण्याच्या पातळीत आणखीनच वाढ होऊन बाजारात पाणी येण्याची भीती येथील व्यावसायिकांना होती. दुपारपर्यंत जरी बाजारात पाणी शिरले नसले तरी अचानक पुराचे पाणी बाजारात शिरल्यास नुकसानीस सामोरे जाण्यापेक्षा त्यापूर्वीच उपाययोजना म्हणून दुकाने रिकामे करण्यात आले. त्याचबरोबर कोरोना (Corona) प्रादुर्भावाने झालेल्या लॉकडाऊनमुळे (lockdown) अनेक महिने बाजारपेठ बंद होती. त्यानंतर स्मार्टसिटीच्या कामांचा फटका. यामुळे येथील व्यावसायिकांचे यापूर्वीच मोठे नुकसान झाले आहे. पुन्हा मोठे नुकसान सहन करणे व्यावसायिकांना शक्य होणार नाही. त्यामुळे पूर्वीच काळजी घेणे फायद्याचे ठरेल. या उद्देशाने दुकाने रिकामे करून घेतली. अशा प्रतिक्रिया यावेळी व्यावसायिकांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT