mht cet.jpeg 
नाशिक

'एमएचटी-सीईटी' परीक्षा निकालाचा लवकरच मुहूर्त; हरकती नोंदविण्यासाठी गुरूवारपर्यंत संधी  

अरुण मलाणी

नाशिक : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र आणि बी. एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष पदवीच्‍या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा पार पडली होती. या परीक्षेनंतरची प्रक्रिया पूर्ण केली जात असून, लवकरच परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना उत्तरतालिका (ॲन्‍सर की) उपलब्‍ध केली जाणार असून, यासंदर्भातील हरकती नोंदविण्यासाठी गुरूवार (ता.१२) पर्यंत मुदत असणार आहे. 

हरकती नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना गुरूवारपर्यंत संधी 

ऑक्‍टोबर महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवड्यात ९ तारखेपर्यंत भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) या ग्रुपची परीक्षा सत्रनिहाय पार पडली होती. तर १२ ते १९ ऑक्‍टोबर दरम्‍यान भौतिकशासत्र, रसायनशास्‍त्र आणि गणित (पीसीएम) या ग्रुपची परीक्षा घेण्यात आली. यानंतरदेखील काही कारणास्‍तव परीक्षेपासून वंचित राहिलेल्‍या विद्यार्थ्यांची विशेष सत्राद्वारे नुकतीच परीक्षा घेण्यात आली. परीक्षेची प्रक्रिया पार पडल्‍यानंतर आता निकालाचे वेध विद्यार्थ्यांना लागले असले तरी तत्‍पूर्वी सीईटी सेलतर्फे आवश्‍यक प्रक्रिया पार पाडली जाणार असल्‍याने आणखी काही दिवस विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. 

निकाल २८ नोव्‍हेंबरच्‍या पूर्वी जाहीर होणार

सीईटी सेलतर्फे नुकतीच सूचना जारी केली असून त्‍यात महत्त्वाच्‍या तारखा जाहीर केल्या आहेत. यात विद्यार्थ्यांनी नोंदविलेली उत्तरे, प्रश्‍नपत्रिका आणि उत्तर तालिका (ॲन्‍सर की) विद्यार्थ्यांच्‍या लॉगइनद्वारे मंगळवारी (ता.१०) दाखविली जाणार आहे. प्रश्‍नांशी निगडीत विद्यार्थ्यांच्‍या काही हरकती असल्‍यास, अशा हरकती नोंदविण्याची मुदत मंगळवार (ता.१०) ते गुरूवार (ता.१२) या दरम्‍यान असेल. तर निकाल २८ नोव्‍हेंबरच्‍या पूर्वी जाहीर केला जाणार असल्‍याचे सीईटी सेलने स्‍पष्ट केले आहे. 

प्रवेश प्रक्रियेला मिळणार चालना 

नियमित शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया होऊन दिवाळीपर्यंत एक सत्र संपलेले असते. परंतु यंदाच्‍या वर्षी कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे अद्यापपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरूदेखील झालेली नाही. परंतु निकाल जाहीर झाल्‍यानंतर लागलीच प्रवेश प्रक्रियेलाही चालना मिळणार आहे. या निकालाच्‍या आधारे अ भियांत्रिकी (बीई), औषधनिर्माणशास्‍त्र (बी. फार्म.) आणि बी.एस्सी (कृषी) या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाणार आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT