bytco.jpg 
नाशिक

स्वगृही जाता येणार असल्याचा अमाप आनंद चेहऱ्यावर...अन् सोबतच रेल्वेबाबत संभ्रमावस्था!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (नाशिकरोड) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर अनेक परप्रांतीय कामगार राज्यात अडकलेले आहेत. त्यांना मूळगावी परतण्यासाठी रेल्वे सुरू केल्यानंतर उर्वरित परप्रांतीय कामगारांनाही गावी परतण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मंगळवारी (ता. 5) बिटको रुग्णालयामध्ये गर्दी झाली होती. रेल्वे कधी सुटणार, ऑनलाइन परवानगी कशी काढतात, या प्रश्‍नांची उत्तरे मिळण्यासाठी कामगारांमध्ये संभ्रमावस्था आहे. 

रोजगार व पुढच्या पोटापाण्याची चिंता

परप्रांतीय कामगारांची तपासणी करून त्यांना सध्या प्रमाणपत्र वितरित करण्यात येत आहे. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी जितेंद्र धनेश्‍वर व त्यांच्या वैद्यकीय पथकाकडून लहान मुले, महिला, मुली यांची तपासणी केली जात आहे. यासाठी तपासणी करून त्यांचे आधारकार्ड अथवा गाडी चालविण्याच्या परवान्यावरील पत्ता तपासण्यात येत आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविल्यानंतर कोठे जायचे, रेल्वे कधी सुटणार आहे ही माहिती कामगारांना मिळत नाही. त्यामुळे कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक कामगार नाशिक रोड रेल्वेस्थानकावर गाडीची चौकशी करण्यासाठी येत आहेत. शिवाय नाशिक रोड पोलिस ठाण्याबाहेर ऑनलाइन परवानगी असा बोर्ड लावला आहे. हातावर काम करणारे सर्वच कामगार टेक्‍नोसॅव्ही नसल्याने सध्या कामगारांना ऑनलाइन परवानगीसाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाशिक रोड येथे कामगारांसाठी तांत्रिक मदत कक्षाची यंत्रणा उभी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान या ठिकाणी जाण्यासाठी जास्तीत जास्त कामगारांनी गर्दी केली आहे. मायदेशी परतण्याची ओढ या कामगारांना लागलेली असून, रोजगार व पुढच्या पोटापाण्याची चिंता त्यांना सतावत आहे. 

कामगार टेक्‍नोसॅव्ही नसल्याने प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. त्यांना ऑनलाइन परवानगी काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑनलाइन परवानगी घेण्यासाठी परप्रांतीय कामगारांसाठी तांत्रिक मदत कक्ष उभा करायला हवा. यासाठी टेक्‍नोसॅव्ही सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्यावी. - योगेश देशमुख, सामाजिक कार्यकर्ते, नाशिक रोड 

वैद्यकीय प्रमाणपत्र घेतल्यावर आम्हाला रेल्वेस्थानकावर जायला सांगत आहेत. रेल्वे कधी सुटणार, किती वाजता असणार, याची माहिती मिळत नाही. सध्या पैसे नसल्यामुळे आम्हाला लवकरात लवकर आमच्या गावी पाठवा, अशी विनंती आम्ही शासनाला करत आहोत. - बच्चन भारद्वाज, कामगार, उत्तर प्रदेश  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT