winter esakal
नाशिक

Nashik Winter Update: ऐन दिवाळीत नाशिककर पुन्‍हा गारठणार! किमान तापमान 2 अंशांनी घटण्याचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

Nashik Weather Forcast : ऑक्‍टोबरअखेर गारव्याचा अनुभव घेतल्‍यानंतर सध्या वातावरणातून गारवा गायब झालेला आहे. अशात ऐन दिवाळीत नाशिककर पुन्‍हा गारठणार आहेत. येत्‍या शुक्रवारपर्यंत (ता. १०) नाशिकचे किमान तापमान साधारणतः दोन अंशांनी घसरून १४ अंश सेल्सिअसपर्यंत पोचण्याची शक्‍यता आहे.

त्‍यानंतरही पाऱ्यात घसरण होऊन गारठा वाढू शकतो, असा अंदाज हवामान खात्‍याने वर्तविला आहे. (minimum temperature is expected to drop by 2 degrees by Friday nashik winter news)

यंदाच्‍या वर्षी पाऊस कमी झाल्‍याने आधीच चिंतेत वाढ झालेली आसवांना, नोव्‍हेंबर उजाडल्‍यानंतरही वातावरणात अपेक्षित गारवा जाणवत नव्‍हता. अवघे दोन-चार दिवस सोडले तर अपेक्षेप्रमाणे थंडी जाणवलेली नाही. गेल्‍या काही दिवसांपासून काहीसे ढगाळ वातावरण राहात असल्‍याने थंडीचे प्रमाण कमी झालेले होते.

परंतु आता आकाश निरभ्र होऊ लागले असून, यामुळे गारव्यात वाढ होण्याची शक्‍यता आहे. सोमवारी (ता. ६) नाशिकचे किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहिले असून, कमाल तापमान ३०.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. यंदाच्‍या हंगामात १४. ५ अंश सेल्सिअसपर्यंत पारा खाली गेलेला असताना, पुन्‍हा वाढ झालेली होती.

अशात नाशिककरांना कडाक्‍याच्‍या थंडीचे प्रतीक्षा लागून होती. दिवाळीमध्ये ही प्रतीक्षा संपणार असून, शुक्रवार (ता.१०) पासून किमान तापमान १४ अंश सेल्सिअसच्या सुमारास राहाण्याची शक्‍यता आहे.

हवामान खात्‍याचा अंदाज

पुढील दोन दिवस बुधवार (ता.८) पर्यंत सकाळच्‍या वेळी वातावरणात धुके तर दिवसातील काही वेळ ढगाळ वातावरण राहाण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे नाशिकचे किमान तापमान १७ अंश सेल्सिअसपर्यंत तर कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहू शकते. गुरुवार (ता.९) पासून आकाश निरभ्र राहणार असून, या दिवसापासून पारा घसरण्यास सुरवात होईल, असा अंदाज हवामान खात्‍याने वर्तविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT