Winter sakal
नाशिक

Nashik Winter Update: नाशिककर गारठले! पारा 14.2 अंशांवर; यंदाच्‍या हंगामातील निच्चांकी किमान तापमानाची नोंद

सकाळ वृत्तसेवा

Nashik Winter Update : काही दिवसांपासून वातावरणातून गायब झालेली थंडी पुन्‍हा एकदा जाणवू लागलेली आहे. विशेषतः सायंकाळनंतर वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळे नाशिककर गारठण्यास सुरवात आहेत.

गुरुवारी (ता.१६) नाशिकचे किमान तापमान १४.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून, हे यंदाच्‍या हंगामातील निच्चांकी तापमान आहे. कमाल तापमान ३०.७ अंश सेल्सिअस राहिले. (minimum temperature was recorded at 14 2 degrees in nashik news)

यंदाच्‍या हिवाळी हंगामात अद्यापपर्यंत अपेक्षेप्रमाणे थंडी पडलेली नव्‍हती. ऑक्‍टोबर महिन्‍याच्‍या शेवटच्‍या आठवड्यात गारठा जाणवू लागलेला असताना गेल्‍या २८ ऑक्‍टोबरला नाशिकचे किमान तापमान १४.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. मात्र त्‍यानंतर सातत्‍याने पाऱ्यात वाढ नोंदविली गेली होती.

कधी तप्त उन तर कधी ढगाळ वातावरण यांमुळे वातावरणात थंडी जाणवत नव्‍हती. दिवाळीनंतर वातावरणात गारठा वाढण्याचा अंदाज हवामान खात्‍याने वर्तविलेला होता.

त्‍यानुसार गेल्‍या काही दिवसांमध्ये सातत्‍याने पाऱ्यात घसरण नोंदविली जात होती. गुरुवारी (ता.१६) नाशिकचे किमान तापमान १४.२ अंश सेल्सिअस राहिले. हे यंदाच्‍या हंगामातील निच्चांकी किमान तापमान आहे.

स्‍वेटर, जॅकेटसह कानटोपीचा आधार

सकाळी आणि सायंकाळच्‍या वेळी वातावरणातील गारव्‍यामुळे सावधगिरी म्‍हणून नागरिकांकडून स्‍वेटर, जॅकेटसह कानटोपीचा आधार घेतला जातो आहे. त्‍यामुळे अनेक महिन्‍यांपासून कपाटात ठेवलेले स्वेटर, जॅकेट आता बाहेर निघू लागलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT