chhagan bhujbal pahani.jpg
chhagan bhujbal pahani.jpg 
नाशिक

VIDEO : "जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांत सोशल डिस्टन्स् व स्वच्छता पाळा" - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून रेशनच्या माध्यमातून अन्न धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत पाच रुपये दराने १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री ना.छगन भुजबळ यांनी आज(ता.३) नाशिक शहरातील रेशन दुकान व शिवभोजन केंद्रांना भेटी देऊन रेशन दुकानावर धान्य वितरण करतांना तसेच शिवभोजन केंद्रावर सोशल डिस्टन्स् आणि स्वच्छता पाळण्याच्या सूचना दिल्या. 

भुजबळ यांची अन्नछत्राला भेट देऊन पाहणी

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने रेशनच्या माध्यमातून अन्नधान्य व शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. मात्र या योजना राबवीत असतांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून करण्यात आलेल्या सूचनांचे पालन होऊन गरीब व गरजू नागरिकांना जेवण व अन्न धान्य मिळते की नाही याबाबत आढावा घेण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक शहरातील रेशन दुकान, शिवभोजन केंद्र, किराणा दुकान, मेडिकल स्टोअर्स आणि महानगरपालिकेच्या अन्नछत्राला भेट देऊन पाहणी केली. 

२३ मनपा शाळांमध्ये निवारा केंद्र व अन्नछत्राची सुविधा

नाशिक शहरात गोरगरीब, बेघर, मजूरवर्ग, तसेच बाहेरून आलेल्या मजुरांसाठी शासनाने महानगरपालिकेच्या माध्यमातून नाशिक शहरात २३ मनपा शाळांमध्ये निवारा केंद्र व अन्नछत्राची सुविधा केंद्र सुरु केली आहे. या निवारांकेंद्रामध्ये एकूण ५७९ लोक दाखल असून छगन भुजबळ यांनी आज नाशिक महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय मनपा शाळा क्र.१ म्हसरूळ येथील केंद्रावर भेट देऊन पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT