dada bhuse on malegaon.jpg 
नाशिक

VIDEO : "सावरा..पोलीसांवर धावून गेलात..तर त्याची गय केली जाणार नाही" 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव  :  मालेगाव शहरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. यामुळे नागरिकांवर भितीचे सावट पसरले आहे. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य प्रशासनासह पोलिस प्रशासन जीवाचे रान करुन अहोरात्र झटत आहेत. त्यांच्याबद्दल सहानुभूती ठेवत त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे सहकार्य अपेक्षीत असतांना त्यांच्यावर धावून जाणे, रुग्णालयात तोडफोड करणे ही अतिशय खेदाची बाब आहे. लॉकडाऊनमुळे प्रत्येक नागरिकाला बंधिस्त रहावे लागत असतांना त्याला 97 टक्के नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काही मुठभर लोकांकडून असे बेकायदेशीर प्रकार होत आहेत, ते बरोबर नाही. कुणी जाणून बुजून असे प्रकार करुन कायदा होतात घेत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगावा व प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी केले आहे.शासकीय विश्रामगृहात मालेगाव येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. 

आरोग्य सुविधेतील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही

कोरोना विषाणूशी लढा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्या, रुग्णालयातील स्वच्छतेवर लक्ष देण्यात यावे. रुग्णांची विशेष काळजी घेण्यात यावी. अशा सुचना देतांना आरोग्य सुविधेतील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही असे निर्देश मंत्री दादा भुसे यांनी आज (ता.२३) दिले.
 शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ.पंकज आशिया, पोलिस अधिक्षक (ग्रामीण) आरती सिंग, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलिस अधिक्षक संदीप घुगे, माजी आमदार आसिफ शेख, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस, तहसिलदार शिवकुमार आवळकंठे, उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

कायदा हातात घेवू नका; कारवाईला आमंत्रण देवू नका

रमजान पर्वाच्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनामार्फत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतांना मंत्री भुसे म्हणाले, प्रतिबंधित क्षेत्रातील व त्याबाहेरील प्रत्येक नागरिकांपर्यंत आवश्यक त्या सुविधा पोहचल्या पाहिजे. भाजीपाला, दुध व फळे यांचे नियोजन करतांना महानगरपालिकेमार्फत सुचविण्यात आलेल्या प्रभागातील दहा ठिकाणांपर्यंत वितरणाचे सुयोग्य नियोजन करण्यात यावे. प्रशासनाने देखील शासकीय चौकटीत न राहता मानवतावादी दृष्टीकोनातून नागरिकांना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध केल्यास नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

नागरिकांनी घाबरुन न जाता उपचारासाठी पुढे यावे.
माजी आमदार आसिफ शेख यांनी देखील त्यांच्या सहकार्यांच्या व स्वयंसेवकांच्या मदतीने प्रशासन व नागरिकांमध्ये समन्वय साधून अत्यावश्यक सेवा, सुविधा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्यास सहकार्य करावे असेही मंत्री भुसे म्हणाले.

 प्राथमिक पातळीवरील कोरोनाचा रुग्ण लवकर बरा होतो. 

मालेगाव शहरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात लक्षणे दिसून येत असली तरी उपचारासाठी ते पुढे येत नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता पुढे यावे. प्राथमिक पातळीवरील रुग्ण हा लवकर बरा होतो. मालेगाव शहरातील पहिल्या टप्प्यातील काही बाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर त्यांचे निगेटिव्ह रिपोर्ट हाती येत आहेत. राज्यातील मयत रुग्णांच्या तुलनेत कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचा वाढता आकडा हा दिलासादायक आहे. त्यामुळे नागरिकांनी सकारात्मकता दाखवून कोरोनाला हरविण्यासाठी स्वत:हून पुढे यावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मंत्री भुसे यांनी नागरिकांना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मुंबई पुणे एक्सप्रेस वे'वर वाहतूक कोंडीतही टोल वसुली, मनसेच्या दणक्यानंतर पैसे परत करण्याचं IRBचं आश्वासन

T20 WC, IND vs PAK: भारतीयांसमोर पाकच्या फिरकीचे आव्हान; सायंकाळपर्यंत पावसाचा अंदाज, मात्र त्यानंतर खेळ होण्याची शक्यता

CM Yogi Adityanath: लाडक्या बहिणींना १५०० रुपये पेन्शन; योगी सरकारची मोठी योजना, पाहा कोणा-कोणाला होणार फायदा

Ind vs Pak: यालाच म्हणतात तयारी! पाकिस्तानला भिडण्यासाठी सूर्यकुमार यादव बनला ‘उस्मान तारिक’, नेट्समध्ये गोलंदाजीची हुबेहूब नक्कल

Satara Tourist Death: सातारच्या पर्यटकाचा राजगडावर हृदयविकाराने मृत्यू; सकाळीच्या सुमारास बालेकिल्ल्याचे दर्शन घेतलं अन् काय घडलं?

SCROLL FOR NEXT