gulabrao_patil.jpggulabrao_patil.jpg 
नाशिक

"निवडून आल्यावर पैसा खायचा..निवडणुका लागल्यावर पैसा वाटायचा..हाच भाजपवाल्यांचा धंदा!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक  : भाजपकडे प्रचंड पैसा आहे. निवडून आल्यावर पैसा खायचा व निवडणुका लागल्यावर पैसा वाटायचा हा एकमेव धंदा भाजपवाल्यांचा आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले असल्याने महाराष्ट्राचा विकास निश्‍चित आहे. भाजपच्या काळात घोषणा अधिक व कामे कमी झाल्याचेही ते म्हणाले. नोटाबंदीमुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे. नोटाबंदीमुळे महिलांना स्वयंपाकघराच्या डब्यात ठेवलेला आपला बचतीचा पैसाही बाहेर काढावा लागला. अशी टीका राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिकमध्ये काल (ता.५) केली. 

...तर राज ठाकरे संगीत क्षेत्रात असते 

राज्यात आम्ही तीन पक्ष मिळून एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे राज्याचा विकास नक्कीच होणार. राज ठाकरेंच्या मागे ठाकरे आडनाव नसते तर कदाचित राज राजकारणाऐवजी संगीत क्षेत्रात दिसले असते, अशी बोचरी टीका राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. 
प्रभाग क्रमांक 26 च्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी उमेदवाराच्या प्रचारार्थ मंत्री गुलाबराव पाटील यांची खुटवडनगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोर सभा झाली. 

स्वत: मोर्चात सहभागी होणार : 
तुम्ही निवडून दिलेला शिवसेनेचा लोकप्रतिनिधी कामे करीत नसेल तर त्याच्या दारी स्वत: गुलाबराव पाटील मोर्चा काढेल, असे आश्‍वासन मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. शिवसेना हा नुसताच पक्ष नसून एक विचार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊन काम करणारे आम्ही लोक आहोत. गद्दारी आमच्या रक्‍तात नाही. गद्दारी केल्यावर शिवसेना कसा धडा शिकवते हे महाराष्ट्राने पाहिले असल्याची टीकाही त्यांनी भाजपचे नाव न घेता केली. 

या वेळी महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृहनेते विलास शिंदे, माजी सभागृहनेते सुधाकर बडगुजर, नगरसेवक भागवत आरोटे, नगरसेविका सुवर्णा मटाले, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, कल्पना पांडे, कल्पना चुंबळे, हर्षदा गायकर, महानगरप्रमुख विलास शिंदे, संतोष गायकवाड, कॉंग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT