police esakal
नाशिक

नाशिक : पोलिस शिपायाकडूनच अल्पवयीन मुलीचे अपहरण

योगेश मोरे

नाशिक : एका पोलिस शिपायाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून रक्षकच बनला भक्षक असे चित्र नाशिकमध्ये समोर आले आहे. जर पोलीसाकडूनच असा प्रकार घडला तर महिलेची सुरक्षितता वाऱ्यावर आहे. काय घडले नेमके?

रक्षकच बनला भक्षक! नाशिकमधील धक्कादायक प्रकार

उपनगर पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत असलेला दीपक जठार पंचवटी परिसरातील एका अल्पवयीन मुलीला रविवारी (ता. १२) दुपारी घेऊन गेला होता, अशी तक्रार पीडित मुलीच्या आईवडिलांनी सोमवारी (ता. १३) सकाळी म्हसरूळ पोलिसांकडे दिली. त्यावरून वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने शोध मोहीम राबविली. दोघांचेही मोबाईल बंद असल्याने तपासात अडचण निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी मोठ्या कौशल्याने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाइल टॉवर लोकेशन घेऊन दुपारी नांदूर नाका परिसरातून संशयित दीपक व पीडित मुलीस ताब्यात घेतले. संशयिताची कारही पोलिसांनी जप्त केली. दरम्यान, म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पीडित मुलीशी संशयित दीपक याची जवळपास दीड वर्षापासून ओळख असल्याचे बोलले जात आहे. याच ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले, अशीही चर्चा पोलिस वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे संशयित दीपक विवाहित आहे. येथील एका पोलिस शिपायाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी पीडितेच्या आईवडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलिसांनी संशयितासह पीडित मुलीला अवघ्या दोन तासांत ताब्यात घेतले.

पीडितेच्या आई-वडिलांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हे शोध पथकाने तपासाची सूत्रे वेगाने फिरवून संशयितासह पीडितेला ताब्यात घेतले. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून संशयितास अटक केली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करून तिला आईवडिलांच्या ताब्यात दिले आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार संशयितावर पुढील कारवाई केली जाणार आहे. महिला अधिकारी धनश्री पाटील यांनी मुलीचे जबाब घेतले असून, त्या पुढील तपास करीत आहेत. -भारतकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, म्हसरूळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT