beating to neibour.jpg 
नाशिक

'तुमचा कुत्रा माझ्या मुलाच्या अंगावर धावून गेला'...म्हणून 'ते' समजवायला गेले...तर चक्क त्यांनी

सकाळवृत्तसेवा

नाशिक : जयभवानी रोडवरील जेतवननगरात लहान मुलाच्या अंगावर कुत्रा धावून आल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी होऊन दगडफेक झाली. याप्रकरणी दोन गटांत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. 

असा आहे प्रकार

श्रीकांत वाकोडे (रा. जेतवननगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची लहान मुले अंगणात खेळत असताना शेजारील संशयित सुनीता आवारे यांचा कुत्रा मुलांच्या अंगावर धावून गेला. वाकोडे यांनी आवारे यांना समजावून सांगण्यासाठी गेले असता, याचा राग येऊन संशयित सुनीता आवारे, आकाश आवारे, साहील आवारे, राजू दिवे यांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच कुऱ्हाडीने मारून जखमी केले. तर सुनीता आवारे यांच्या फिर्यादीनुसार, जुन्या भांडणाची कुरापत काढून बारकू वाकोडे, राजू पगारे, सनी पगारे, राहल खरे यांनी शिवीगाळ करीत त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या घरावर दगड फेकून तोडफोड केली. 

शुल्लक कारणावरुन विकोपाला गेलेल्या याप्रकरणी उपनगर पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Crime: नांदेडमध्ये मध्यरात्री तलवारी खंजरने हल्ला; २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून

Nagpur Fake Teacher ID Scam: ६७२ बोगस शिक्षकांकडून होणार वेतनाची वसुली? सायबर पोलिस करणार न्यायालयात मागणी

‘इंडियन आयडॉल : यादों की प्लेलिस्ट’ ला मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रियदर्शिनी इंदलकर आणि नम्रता संभेराव यांचा भरभरून प्रतिसाद!

Mahavitaran Recruitment : विद्युत सहाय्यक पदासाठी प्रतीक्षा यादी जाहीर; ६ व ७ नोव्हेंबरला कागदपत्रांची पडताळणी

Kolhapur Election : 'पदवीधर'ची बाजारात 'तुरी', महायुतीत वादाची 'धुरी'; मंत्री चंद्रकांत पाटील-हसन मुश्रीफ यांच्यात रंगला राजकीय कलगीतुरा

SCROLL FOR NEXT