Job Fair e sakal
नाशिक

Employment News : अल्पसंख्याक तरुणांना रोजगाराच्या संधी! या संस्थेमार्फत मिळणार कर्जरूपी निधी

प्रशांत बैरागी

Employment News : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज स्वरूपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून अल्पसंख्याक समाजासाठी व्यवसाय, उद्योग सुरु करण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. '

संपूर्ण राज्यभरातून मुदत कर्ज योजनेंतर्गत १ हजार ५५३ अर्ज विविध जिल्हा कार्यालयामध्ये प्राप्त झाले असून जिल्ह्यातून केवळ ७ प्रस्ताव दाखल झाल्याचे शासकीय आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

अधिकाधिक तरुणांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ३१ मेपर्यंत नवीन अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे अल्पसंख्याक समुदायातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत मिळेल. (Minority youth will get employment opportunities through National Minority Economic Development Corporation nashk news)

महामंडळ हे राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवं वित्त निगम यांची राज्य वाहिनीकृत यंत्रणा म्हणून कार्यरत आहे. निगममार्फत कर्ज स्वरूपात प्राप्त होणाऱ्या निधीतून मुदत कर्ज योजना, सूक्ष्म पतपुरवठा योजना,

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना यांची अंमलबजावणी महामंडळामार्फत राज्यात करण्यात येते. या योजनांमध्ये लाभार्थ्यांच्या आर्थिक उत्पन्न मर्यादेच्या आधारे काही सुधारणा करण्यात आल्या असून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गतवर्षी ११ नोव्हेंबर २०२२ रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंतीदिनापासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. मुदत कर्ज योजनेंतर्गत छोट्या व्यवसायांना प्रथम प्राधान्य देऊन ३ लाख २० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर करून मंजुरीपत्र लाभार्थ्यांना निर्गमित करण्यात येत आहेत.

या योजनेंतर्गत राज्यातील ७८३ लाभार्थ्यांना आतापर्यंत मंजुरीपत्र निर्गमित करण्यात आले आहेत. कर्ज मंजुरीपत्र निर्गमित केलेल्या लाभार्थ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रावरून स्थळपाहणी करण्याच्या सूचना कर्जवितरण अधिकारी व कर्जवसुली अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

दस्तऐवजांची पुर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जाची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने कर्ज परतफेडीसंदर्भातील बँकेकडील तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना कर्ज रकमेचे त्वरित वितरण करण्यात येणार असल्याचे अल्पसंख्याक महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सदर योजनेंतर्गत मुंबईतून ४ अर्ज, ठाणे १, रायगड २, पुणे ८४, सोलापूर ४४, सातारा १२, सांगली १०, कोल्हापूर १०२, नाशिक ७, नंदुरबार १५, धुळे २९, जळगाव १०१, अहमदनगर ४२, औरंगाबाद ९६, परभणी १७३,

बीड २१५, लातूर ५३, जालना ८२, हिंगोली ४३, नांदेड ९, उस्मानाबाद ६१, अमरावती १८, वाशीम ५४, बुलडाणा १५७, यवतमाळ ९७, अकोला २७, नागपूर १३ तर वर्धा जिल्ह्यातून २ अर्ज जिल्हास्तरावर प्राप्त झाले आहेत.

"योजनेला अल्पसंख्याक समाजाचा मिळालेला प्रतिसाद विचारात घेता प्राप्त झालेल्या अर्जावर जलदगतीने कार्यवाही करण्यासाठी ३१ मेपर्यंत नवीन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. प्राप्त झालेल्या अर्जाचा निपटारा करण्यासाठी ३१ मे २०२३ नंतर पुढील आदेश होईपर्यंत या योजनेंतर्गत नव्याने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही." -डॉ. लालमिया शरीफ शेख, व्यवस्थापकीय संचालक, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT